Take a fresh look at your lifestyle.

अपहरण की स्वतःच झालेत गायब; चर्चेला उधाण, गावात निषेधाचे आंदोलन..!

अहमदनगर :

Advertisement

ग्रामपंचायत निवडणूक झाल्यावर आता सरपंच या महत्वाच्या पदाच्या निवडी केल्या जात आहेत. त्यामुळे सध्या राज्यभरात सदस्यांची पळवापळवी जोमात सुरू आहे. निघोज (ता. पारनेर) येथील दोन सदस्यही अशाच पळवापळवीच्या घटनेमुळे चर्चेत आलेले आहेत. मात्र, ते पळवले गेले की पळून गेले हेच कोडे अवघ्या तालुक्याला पडले आहे.

Advertisement

रविवारी ही घटना घडली. आता सरपंच पदाची निवड झाल्यावरच त्यांच्या गायब होण्याचे मूळ कारण स्पष्ट होणार आहे. निघोज येथील सदस्य सहलीवर होते. दरम्यान, लघुशंकासाठी गाडीतून खाली उतरल्यावर खेड (जि. पुणे) येथून दोघेजणही गायब आहेत. त्याना आठ-दहा जणांनी पळवले आहे.

Advertisement

निघोज गावात सध्या संदीप वराळ यांच्या गटाचे 8 सदस्य निवडून आलेले आहेत. तर, सत्ताधारी ग्रामविकासला फ़क़्त 4 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे महाविकासच्या दोन आणि इतर स्वतंत्र 3 सदस्यांना मोल आलेले आहे. अशावेळी सदस्यांची पळवापळवी जोमात आहे. त्यातूनच हा प्रकार घडला आहे. दरम्यान, या घटनेमुळे गावात निषेधाचे आंदोलन चालू आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply