दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंदोलनजीवी जमात जन्माला आल्याचे म्हटले आहे. हा टोला त्यांनी थेट शेतकरी आंदोलनास लगावला आहे.
टिकैत यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, 30 वर्षांपासून गरीब कष्टकरी शेतकऱ्यांची लढाई लढत आहे. मला आंदोलनजीवी असल्याचा गर्व आहे. एकूणच मोदींनी देशात सध्या फ़क़्त केंद्र सरकारला लक्ष्य करण्यासाठी काहीजण आंदोलन करीत असल्याचा मुद्दा मांडला आहे. मात्र, मग आंदोलन करणाऱ्यांची भावना यामुळे दुखावली आहे.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनास तत्कालीन विरोधी पक्ष असलेल्या भाजपचा उघड पाठींबा होता. लोकशाही पद्धतीने होणाऱ्या आंदोलनाची दखल घेणाऱ्या काँग्रेस काळात आंदोलक म्हणजे देशद्रोही असे म्हटले जात नसे. आता मात्र, आंदोलनास दहशतवादी ठरवले जात आहे. अशावेळी मोदी यांनीही वेगळी भावना व्यक्त केल्याने आता आंदोलकांना आणखी एक मुद्दा हातात भेटला आहे.
संपादन : सचिन पाटील
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- म्हणून अजित पवारांनी दिली वीजबिल वसुलीस स्थगिती; पहा कोणापुढे वरमले ठाकरे सरकार
- फडणविसांनी विधिमंडळात मांडले ‘हे’ महत्वाचे मुद्दे; पहा नेमके कशावर काय म्हटलेय त्यांनी
- फडणवीसांच्या ‘जलयुक्त’ची चौकशी जोरात; पहा कुठे होत आहे आढावा बैठक
- आई..गं.. हेडफोनचा बसतोय असाही फटका; कोट्यावधी लोकांवर झालेत ‘हे’ दुष्परिणाम.!
- ‘तिथे ठेवलेत राठोडांनी दिलेले 5 कोटी’; पूजाच्या आजीने केला धक्कादायक दावा