दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या क्रांतिकारी कृषी सुधारणा विधेयकाच्या विरोधात अडीच महिन्यापासून दिल्लीत आंदोलन चालू आहे. त्यात आतापर्यंत 70 शेतकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे. तरीही केंद्र सरकार आपल्या भूमिकेवर ठाम असून निधन झालेल्या शेतकऱ्यांना कोणतीही नुकसानभरपाई दिली जाणार नसल्याचे मोदी सरकारने स्पष्ट केले आहे.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्रातील मोदी सरकारने दिल्ली हिंसाचारात किंवा किसान आंदोलनात ठार झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना कोणतीही भरपाई दिली जाणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले आहे. यापूर्वी कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनीही याबाबत माहिती दिली होती.
लोकसभेत सरकारने निवेदनात म्हटले आहे की, निषेधाच्या वेळी मरण पावले गेलेले पंजाब, हरियाणा आणि उत्तरप्रदेशमधील लोकांना सरकार कोणतीही भरपाई दिली जाणार नाही. तीन वादग्रस्त शेती कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान ठार झालेल्या शेतकरी कुटुंबियांना नुकसानभरपाई देण्याचा कोणताही प्रस्ताव नाही.
केंद्राने आंदोलनात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई देण्याचा प्रस्ताव ठेवला काय, या प्रश्नावर माहिती देताना सरकारने हे निवेदन केले आहे. याबाबत कृषीमंत्री म्हणाले की, 10 ऑक्टोबर 2020 ते 21 जानेवारी 2021 दरम्यान प्रश्न सोडविण्यासाठी सरकार आणि आंदोलनशील शेतकरी संघटना यांच्यात बैठकीच्या एकूण 11 फेऱ्या झाल्या. त्यामुळे असा कोणताही प्रस्ताव नाही.
उलट सप्टेंबर ते डिसेंबर या काळात निषेध करणार्या शेतकर्यांवर 39 गुन्हे नोंदविण्यात आले. जे दिल्लीच्या सीमेवर अजूनही आंदोलन करत आहेत. एकूणच आंदोलक आणि शेतकरी हे दोघेही आपापल्या पद्धतीने आपली बाजू लावून धरून आहेत.
संपादन : सचिन मोहन चोभे
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- टोमॅटो बाजारभाव अपडेट : पुण्यात 1500 तर सोलापुरात 400; वाचा, संपूर्ण राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : ज्वारीच्या दरातही सलग दुसर्या दिवशी घसरण; पहा, संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- बाजारभाव अपडेट : हरभरा 6400 वर; वाचा संपूर्ण राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : तूर 7,050 च्या पार; वाचा, संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभाव
- बाजारभाव अपडेट : सलग 3 दिवसांपासून कांद्याच्या दरात घसरण; वाचा, संपूर्ण राज्यातील ताजे मार्केट रेट