Take a fresh look at your lifestyle.

बिजनेस इन्फो | म्हणून अॅग्रीबिजनेसमध्ये आहेत अफाट संधी; वाचा, विचार करा आणि कामाला लागा

भारत हा कृषी प्रधान देश आहे, हे आपण प्रत्येक पुस्तकात वाचतो आणि राजकीय व्यासपीठावरून ऐकतो. मात्र, देशाची एकूण परिस्थिती लक्षात घेतल्यास खरेच तसे चित्र आहे किंवा नाही याची संशांकता वाटते ना? वाटायलाच पाहिजे, असे हे चित्र आहे. परंतु, म्हणजे शेतीत सगळे काही वाईट आणि नकारात्मक आहे असेही नाही. शेतीत नव्हे कोणत्याही व्यवसायात संधी असतात. त्यासाठी लागते सातत्याने काम करण्याची तयारी.

Advertisement

लेखन : सचिन मोहन चोभे, संपादक, कृषीरंग

Advertisement

देशाच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचा वाटा त्या मानाने फारच कमी आहे. करोना कालावधीत मात्र, तरीही याच क्षेत्राने देशाला काहीतरी आशादायक चित्र पाहायला लावले. अवघे जग ठप्प झालेले असतानाही शेती मात्र अविरतपणे चालू होती. कारण, खाणारी तोंडे काही बंद होऊ शकत नाहीत. त्यामुळे शेती आणि त्यावर आधारित धंदे, उद्योग व व्यवसाय चालूच होते. आणि जगावर यापेक्षाही भयंकर संकट आले तरीही शेती आणि शेतकरी कार्यरत राहतील. तसेच या क्षेत्राशी निगडीत बिजनेसमनही.

Advertisement

शेतीकडे आपण सगळेजण नकारात्मक पद्धतीने पाहतो त्याची दोन प्रमुख करणे आहेत. एक म्हणजे शेती अजूनही आपल्याकडे फ़क़्त उदारनिर्वाहाचा व्यवसाय आहे. त्याला उद्योग व व्यवसायाचा दर्जा नाही. ना कागदोपत्री ना सामाजिकदृष्ट्या. म्हणून प्रचलित पद्धतीने शेतीकडे पाहण्याचा नकारात्मक भाव कायम आहे. शेतीतील निव्वळ नफा अजूनही शेतकरी विचारात घेत नाहीत. म्हणजेच शेतकऱ्यांमध्ये व सरकारच्या लेखीही शेतीबाबतीत आवश्यक असलेला उद्योजकतेचा अभाव ठळकपणे दिसतो.

Advertisement

आणि शेती म्हणजे नसती डोकेदुखी असे समजण्यासाठीचे दुसरे कारण म्हणजे शेती उत्पादनावर प्रक्रिया करण्याचा अभाव. उत्पन्न वाढविण्याकडे शेतकऱ्याचा कल नाही कारण, समजा उत्पन्न वाढले तर त्याचे काय करायचे? फेकून देण्यासाठी तर आपण उत्पादन घेत नाहीत ना? त्यामुळे प्रक्रिया उदयोग सुरु करण्यासाठीची चळवळ ही भारताची गरज आहे. आपल्या शिक्षण पद्धतीने कारकुनी व्यक्ती तयार करण्याचा ठेका घेतला आहे. अशावेळी तरुणांमधील उद्योजकीय कौशल्याचा अभावच शेतीसाठी घातक आहे. परिणामी हाच शेतकरी आणि पर्यायाने देशाची आर्थिक उन्नतीमध्ये अडथळा ठरत आहे.

Advertisement

युवकांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये उद्योजकता हा गुण वाढीस लावण्यासाठी ठोस धोरण पुढे करून काम करावे लागणार आहे. मात्र, त्याचा अभाव आहे म्हणून जग काही ठप्प झालेले नाही. अनेकांनी शेतीच्या क्षेत्रात व्यावसायिक किंवा उद्योजक म्हणून आपले स्थान पक्के केले आहे. किंवा काहीजण त्यासाठी धडपडत आहेतच की. म्हणूनच तरुण व शेतकरी यांच्यात असे आवश्यक असलेले उद्योजकीय कौशल्ये विकसित करण्यासाठी ही लेखमाला लिहिण्याचा प्रयत्न.

Advertisement

पुढील भागांमध्ये आपण अनेक घटक पाहणार आहोत. याबाबतीत आपणास काही प्रश्न किंवा अडचणी कोणत्याही टप्प्यावर जाणवल्या तर आम्हाला ईमेलने लिहा. याबाबतीत शक्य होईल ते मार्गदर्शन करण्याचा आमचा प्रयत्न असेल.

Advertisement

(भाग 1)

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply