Take a fresh look at your lifestyle.

नितिन गडकरींनी गाड्या विकणार्‍यांना दिली ‘ही’ भन्नाट ऑफर; वाचा, किती मिळणार लाभ

मुंबई :

Advertisement

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी हे वाहनांसंबंधित अनेक नवे नियम समोर आणत असतात. अशातच आता जुन्या गाड्या विकणार्‍यांसाठी केंद्र सरकारने एक भन्नाट ऑफर आणली आहे. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी घोषणा केली आहे की, अनेक जुने गाड्या जास्त धूर सोडतात परिणामी प्रदूषण होते. त्यामुळे अशा जुन्या गाड्या भंगारात काढून त्या वाहनमालकाने नवे वाहन खरेदी केल्यास त्यासाठी सरकार प्रोत्साहनपर लाभ देईल.

Advertisement

पुढे बोलताना गडकरी यांनी सांगितले की, या धोरणाचा लाभ जसा वाहनमालकांना होईल, तसाच तो वाहन उद्योगालाही होणार आहे. वाहन उद्योगात आलेले शैथिल्य दूर होऊन या उद्योगाला ३० टक्के फायदा होईल आणि या उद्योगक्षेत्राची उलाढाल येत्या वर्षांत १० लाख कोटींवर जाईल.

Advertisement

रस्ते वाहतूक व महामार्ग सचिव गिरीधर आरामाने यांनी सांगितले की, जुनी कार स्वेच्छेने मोडीत काढून त्याबदल्यात नवे वाहन खरेदी केल्यास नेमका त्या वाहनमालकाला कसा लाभ द्यावा याविषयीचा प्रस्ताव तयार झाला असून असा प्रस्ताव तयार करण्यासाठी संबंधित घटकांशी चर्चा केली आहे.  

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply