मुंबई :
सत्तेत आल्यापासुन शिवसेनेने भाजपला अनेक धक्के दिलेले आहेत. आता ऐन मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना अधिकच आक्रमक झाल्याचे दिसत आहे. आज मुंबई भाजपला अजून एका धक्का बसला आहे. दोन वेळा नगरसेविका राहिलेल्या प्रेसिला कदम यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले. माजी नगरसेविका प्रेसिला कदम यांचे पती अनिल कदम हे कट्टर भाजप कार्यकर्ते आणि भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जायचे.
काही दिवसांपूर्वी माजी आमदार कृष्णा हेगडे, हेमेंद्र मेहता, भाजपप्रणित बेस्ट संघटनेचे कार्याध्यक्ष विवेक घोलप यांनीही शिवसेनेत प्रवेश केला होता. एकूणच काय तर मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने भाजपला खिंडार पाडण्यास सुरू केले आहे. एवढेच नाही तर सोडून गेलेल्या शिवसैनिकांनाही पुन्हा आणण्यात शिवसेनेला यश मिळत आहे.
वडाळा, नायगाव येथे कोळंबकर यांची चांगली पकड आहे. त्यांच्या या गडालाच
कदम यांच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशाने खिंडार पाडलं आहे.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- बाजारभाव अपडेट : कांद्याच्या भावात घसरण; वाचा, राज्यात कुठे, किती मिळतोय दर
- मार्केट अपडेट : ज्वारीच्या भावात घसरण; वाचा, राज्यातील मार्केट रेट
- बाजारभाव अपडेट : हरभरा 6400 वर; वाचा संपूर्ण राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : तूर 7,300 च्या पार; वाचा, संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभाव
- बाजारभाव अपडेट : पुण्यात द्राक्षाला 9000 भाव; वाचा, संपूर्ण राज्यातील मार्केट रेट