Take a fresh look at your lifestyle.

हे विचार वाचून तुमचा दिवस नक्कीच जाईल फ्रेश; वाचा आणि शेअर करा

१) समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो.
पण एकदा अपेक्षित उंचीवर पोहचलात कि
आयुष्यात अनेक समस्या ती उंचीच सोडवते.

Advertisement

२) आपत्ती पण अशी यावी कि
इतरांना हेवा वाटावा. व्यक्तीचा कस लागावा.
पडायचंच असेल तर ठेच लागून पडून नये.
चांगलं २००० फुटांवरून पडावं.
म्हणजे माणूस किती उंचावर पोहचला होता हे तरी जगाला कळेल.

Advertisement

३) प्रोब्लेम्स कुणाला नसतात? ते शेवटपर्यंत असतात.
पण प्रत्येक प्रोब्लेमला उत्तर असतेच.
ते सोडवायला कधी वेळ हवा असतो,
कधी पैसा तर कधी माणसे.
या तिन्ही गोष्टीं पालिकडचा प्रोब्लेम अस्थित्वात नसतो.

Advertisement

४) कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही
पण गगनभरारीचं वेड हे रक्तातच असावं लागतं. कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही.

Advertisement

५) वादळे जेव्हा येतात तेव्हा
आपण आपल्या मातीला घट्ट रुजून राहायचं असतं.
ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघूनही जातात.
वादळ महत्त्वाचे नसते.
प्रश्न असतो कि आपण त्यांच्याशी कशी झुंज देतो आणि
त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा.

Advertisement

६) पाठीला चमत्कारिक ठिकाणी खाज सुटावी ,
आपला हात वर पोहचत नाही व दुसर्याला नक्की जागा सापडत नाही
अशी अवस्था जीवनात ही बऱ्याचदा होते..

Advertisement

७) माफी मागितल्याने तुम्ही चुकीचे होता आणि समोरची व्यक्ती बरोबर,
हे कधीही सिद्ध होत नाही.
माफीचा खरा अर्थ तुमचं नातं टिकवण्याची लायकी
त्या दुसऱ्या व्यक्तीपेक्षा तुमच्यातच जास्त आहे.

Advertisement

८) खर्च झाल्याचं दुःख नसतं.
हिशोब लागला नाही कि त्रास होतो.

Advertisement

९) शस्त्रक्रिया होण्यापूर्वी प्रत्येक रोगी घाबरलेला असतो.
बरा झाल्यावर शिवलेली जखम
तोच कौतुकाने दाखवत सुटतो.

Advertisement

१०) वाहतो तो झरा आणि थांबतं ते डबकं!
डबक्यावर डास येतात आणि
झऱ्यावर राजहंस!

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply