अमरावती :
उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्पष्ट आणि परखड बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत, हे अवघा महाराष्ट्र जाणतो. त्यांच्या या फटकळ स्वभावाचा फटकाही त्यांना आजवर बसला आहे. प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू हेही आपणा सर्वांना आक्रमक आणि कणखर स्वभावामुळे परिचित आहेत. या दोघांची भरसभेत शाब्दिक वादावादी सुरू झाली तर, असे मनात आणले तरी अंगावर काटा उभा राहतो.
असाच एक प्रसंग अमरावतीमध्ये घडला. सध्या पवार आणि कडू हे दोघेही महाविकास आघाडी सरकारचे प्रतींनिधी आहेत. या दोन्हीही नेत्यांमध्ये भर सभेतच शाब्दिक चकमक झाली. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात अमरावती विभागाच्या वार्षिक नियोजनाची बैठक सोमवारी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अजित पवार आणि बच्चू कडू यांच्यात तू तू मै मै झाली.
कशावरुन झाला वाद :-
लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार अमरावती जिल्ह्यायासाठी ३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. मात्र हा निधी कमी असून विदर्भाचा अनुशेष भरून निघावा यासाठी बैठकीत या दोन नेत्यांमध्ये वाद पेटला.
काय म्हणाले कडू :-
राज्यातील सरकारचा मी एक भाग असल्याने या बाबत काही बोलू शकत नाही मात्र विदर्भाचा अनुशेष भरून निघावा यासाठीच आपण अधिक निधीची मागणी केली होती. ही मागणी असताना निधी मात्र वाढवून देण्यात आला नाही. निधी वाढवण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- टोमॅटो बाजारभाव अपडेट : पुण्यात 1500 तर सोलापुरात 400; वाचा, संपूर्ण राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : ज्वारीच्या दरातही सलग दुसर्या दिवशी घसरण; पहा, संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- बाजारभाव अपडेट : हरभरा 6400 वर; वाचा संपूर्ण राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : तूर 7,050 च्या पार; वाचा, संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभाव
- बाजारभाव अपडेट : सलग 3 दिवसांपासून कांद्याच्या दरात घसरण; वाचा, संपूर्ण राज्यातील ताजे मार्केट रेट