Take a fresh look at your lifestyle.

राष्ट्रवादीची सपशेल पीछेहाट, भाजप जोमात; वाचा नेमकं काय झालंय जिल्हा बँकेच्या निवडणुकीत

अहमदनगर :

Advertisement

सध्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने नगर जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपची पीछेहाट होणार, विखे एकाकी पडणार, भाजप सहकारात कायमच मागे असल्याचा फटका भाजपला या निवडणुकीतही बसणार, असे चित्र बर्‍यापैकी स्पष्ट दिसत असताना विखेंनी आपल्या राजकारणाची जादू पुन्हा दाखवली आहे.

Advertisement

भाजपचे तीन बिनविरोध संचालक झाले आहेत. जामखेडमधून विखे गटाचे जगन्नाथ राळेभात,  शेवगाव- पाथर्डीमधून भाजपच्या आमदार मोनिका राजळे तर राहत्यामधून भाजपचे अण्णासाहेब म्हस्के यांची बिनविरोध संचालकपदी निवड झाली आहे. तर राष्ट्रवादीने शेवगाव, जामखेड आणि राहत्यामधून सपशेल माघार घेतली आहे. भाजपला सळो की पळो करून सोडणार्‍या रोहित पवार यांनीही जामखेडमधून भाजप उमेदवाराला पाठिंबा दिला आहे.   

Advertisement

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजप मागे पडणार, असे प्राथमिक पातळीवर दिसत होते. माजी आमदार राम शिंदे यांची ही निवडणूक लढवण्याची तयारी झालेली नव्हती. तर माजी आमदार शिवाजीराव कर्डीले हे मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या बैठकीला उपस्थित राहिले होते. त्यामुळे विखे एकाकी पडणार, असे चित्र समोर होते. जिल्हा भाजपचा संपूर्ण डोलारा विखेंच्या जिवावर होता. आधीच भाजपच सहकारातील कमी ताकद, पक्षाच्या नेत्यांचा नसलेला सपोर्ट आणि महाविकास आघाडीची एकत्र ताकद यांचा सामना विखे कसा करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते.

Advertisement

अखेर विखेंनी बेरजेचे राजकारण करत राळेभात यांना स्थानिक पातळीवर रोहित पवारांना पाठिंबा देण्याचे सांगितले आहे. आणि काल जगन्नाथ राळेभात यांची जिल्हा बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. दरम्यान राळेभात यांनी स्पष्ट केले आहे की, आम्ही विखे गटाचेच आहोत. आणि विखे यांच्यासोबतच राहणार आहोत. मात्र स्थानिक पातळीवर विकासासाठी आम्ही आमदार रोहित पवार यांच्यासोबत नेहमीच असूत.

Advertisement

एकूण नगर जिल्ह्याचे राजकारण किचकट आहे, इथे कधीही काहीही होऊ शकते, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply