Take a fresh look at your lifestyle.

विखे-पवारांच्या नव्या पिढीचे ‘मनोमिलन’; वाचा, कोणत्या व्यतीने केली ‘ही’ किमया, कुठे घेतली राष्ट्रवादीने माघार

अहमदनगर :

Advertisement

खासदार सुजय विखे हे सहकारात नावाजलेल्या विखे घराण्याच्या चौथ्या पिढीचे नेतृत्व करत आहेत. तर थेट देशाच्या राजकारणात आपला नाणं खणखणीत वाजवणार्‍या पवारांच्या तिसर्‍या पिढीचे नेतृत्व आमदार रोहित पवार करत आहेत. यापूर्वीही रोहित पवार आणि सुजय विखे हे 2 वर्षांपूर्वी एकत्र दिसले होते. दोघांच्या राजकरणाचे कार्यक्षेत्र अहमदनगर जिल्हा असल्याने कधी न कधी समोर येणार हे निश्चितच होते.

Advertisement

आता जिल्हा बँकेच्या निमित्ताने अनेक राजकीय घडामोडी नगरमध्ये घडताना दिसत आहेत. माजी आमदार राम शिंदे यांना नेहमीच टस्सल देणार्‍या रोहित पवार यांनी मात्र या निवडणुकीत विखे यांच्या उमेदवारासाठी एक पाऊल मागे घेतले आहे. विखे यांनीही आपल्या उमेदवारासाठी मैत्रीचा एक हात पुढे केला आहे. रोहित पवारांच्या मतदारसंघातून राष्ट्रवादीने सपशेल माघार घेत भाजप उमेदवाराला पाठिंबा दिला आहे.

Advertisement

पवार आणि विखे यांना एकत्र आणण्याची ही किमया जगन्नाथ राळेभात यांनी साधली आहे. जगन्नाथ राळेभात यांची जिल्हा बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. दरम्यान राळेभात यांनी स्पष्ट केले आहे की, आम्ही विखे गटाचेच आहोत. आणि विखे यांच्यासोबतच राहणार आहोत. मात्र स्थानिक पातळीवर विकासासाठी आम्ही आमदार रोहित पवार यांच्यासोबत नेहमीच असूत.

Advertisement

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजप मागे पडणार, असे प्राथमिक पातळीवर दिसत होते. मात्र आता भाजपने जोरदार मुसंडी हानली आहे. भाजपकडून आमदार मोनिका राजळे, जगन्नाथ राळेभात, अण्णासाहेब म्हसके यांची बिनविरोध संचालकपदी निवड झाली आहे. तर राष्ट्रवादीकडून चंद्रशेखर घुळे यांची निवड झाली आहे.                

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply