Take a fresh look at your lifestyle.

पशुपालन अभ्यासपूर्ण मार्गदर्शिका; थंडीत ‘अशी’ घ्यावी करडांची काळजी

थंडीच्या काळात जनावरांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत असतो. त्यामुळे हवामान बदलानुसार पशुपालन व्यवस्थापनात बदल करणे गरजेचे असते. थंडीच्या दिवसांमध्ये गोठा आणि बाहेरील वातावरणाच्या तापमानात गारवा निर्माण झाल्यामुळे पशूंच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतात. त्याचा झटका थेट व्यवसायाला बसतो. त्यामुळे या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच हिवाळ्यात व्यवस्थापनामध्ये बदल करावेत. 

Advertisement

आज आपण जाणून घेणार आहोत की, थंडीच्या दिवसांमध्ये करडांची काळजी कशी घ्यावी. सर्वप्रथम आपण गोठा आणि व्यवस्थापणात काय बदल करायचे ते लक्षात घेवूयात.   

Advertisement
  1. ज्या पद्धतीने आपण हिवाळ्यात उष्णता जानवावी म्हणून दिवसाही लाइट चालू ठेवतो. त्याच पद्धतीने करडांना गोठ्यात उबदारपणा, उष्णतामान वाढविण्यासाठी लाइट उपयोगी पडते. गोठ्यात लाइटचे बल्ब किंवा ट्यूब बसवून घ्याव्यात. जोपर्यंत गारवा आहे तोपर्यंत लाइट चालूच ठेवाव्यात.
  2. गारव्यात करडांचे कप्पे लवकर कोरडे होण्यास समस्या निर्माण होते. अशावेळी दिवसातून तीन-चार वेळा जागा बदलून करडे कोरड्याच ठिकाणी राहतील याची काळजी घ्यावी. असे न केल्यास लेंड्या, पातळ हगवण किंवा मूत्र यामुळे कप्प्यात ओल राहते.
  3. फरशीपेक्षा मुरूम, मातीची धुम्मस केलेली जमीन अधिक गरम असते.
  4. एका दुरडीखाली चार-पाच करडे हे समीकरण टाळावे.
  5. जन्मानंतर लगेच शरीर वजनाच्या नोंदीवरून करडे अशक्त आहेत का सशक्त आहेत, याचा अंदाज बांधता येतो. गोठ्यामध्ये करडांच्या कप्प्यातील तापमानाकडे दुर्लक्ष केल्यामुळे मरतुकीचे सत्र सुरू होते.

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply