भयंकरच की.. टेक्नॉलॉजीचा गैरवापर; हॅकिंगद्वारे एकाचवेळी 15,000 लोकांना मारण्याचे प्लॅनिंग..!
वैज्ञानिक शोध किंवा कोणतेही तंत्रज्ञान हे एक दुधारी हत्यार असते. जिलेटीन कांड्यांचा शोध हा जसा खेड्डे खोडून काढण्यासाठी महत्वाचा होता तसाच युद्धात बॉम्ब बनवण्यासाठीही हा उपयोग तितकाच महत्वाचा असल्याचे सिद्ध झाले आहे. तसाच प्रकार संगणक आणि त्याच्याद्वारे होणाऱ्या हॅकिंगचाही आहे.
आत्तापर्यंत आपण सर्वांनी संगणक व मोबाईल हॅक करण्याच्या बातम्या वाचल्या असतील. हॅकर्स बर्याचदा एखाद्या विशिष्ट व्यक्तीला किंवा संस्थेला लक्ष्य करतात. परंतु जर हॅकिंगने 15,000 लोकांच्या जीवावर ओढवले तर..! अमेरिकेत ही घटना घडली आहे. जगातील सर्वात धोकादायक हॅकिंग म्हणून याची नोंद आहे. पाण्यात रासायनिक विषारी असे मिश्रण करून लोकांना मारण्याचे हे धक्कादायक प्रकरण आहे.
अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये एका संगणक हॅकरने राज्यातील एका शहरातील पाणीपुरवठा प्रकल्प हॅक करून पाण्यात विषारी रसायने जोडण्याचा प्रयत्न केला आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, एका हॅकरने ओल्डस्मार सिटीच्या वॉटर ट्रीटमेंट सिस्टमला हॅक करून पाण्यात सोडियम हायड्रॉक्साईडचे प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न केला. एका कर्मचार्याच्या ते वेळीच लक्षात आल्याने हा माथेफिरूचा प्रयत्न फसला.
पाण्यात आम्लता रोखण्यासाठी सोडियम हायड्रॉक्साईड कमी प्रमाणात वापरला जातो, त्याचे प्रमाण वाढल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही आणि हॅक करण्याचा प्रयत्न अमेरिकेतून झाला आहे की इतर परदेशातूनही हेही स्पष्ट झालेले नाही.
प्लांटच्या ऑपरेटरला सकाळी सिस्टममध्ये कोणीतरी हस्तक्षेप केल्याचे लक्षात आले. सुरुवातीला त्याला अजिबात संशय आला नाही. परंतु तोच प्रयत्न दुसऱ्या दिवशी दुपारी पुन्हा केला गेला. हॅकरने वॉटर ट्रीटमेंटचे सॉफ्टवेअर हॅक केले होते. पाण्यात सोडियम हायड्रॉक्साईडचे प्रमाण त्याने 100 दशलक्ष प्रति दशलक्ष यावरून थेट 11,100 भाग प्रति दशलक्ष पर्यंत वाढवले. ऑपरेटरने त्वरित हे सामान्य स्थितीत आणले आणि सुमारे 15,000 लोक वाचले.
सोडियम हायड्रॉक्साईडमुळे त्वचा व डोळ्यांना त्रास होतो. केसही गळतात. ते पोटात गेल्यास तोंड, घसा आणि पोटास हानी पोहोचवू शकते. उलट्या आणि चक्कर व्यतिरिक्त अतिसारदेखील होतात. एफबीआय आणि इतर पोलीस एजन्सी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत.
संपादन : सचिन मोहन चोभे
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- ‘त्या’ लोकप्रिय अॅपद्वारे घुसतोय मालवेअर; पहा कोणती आहेत धोकादायक अॅप्लिकेशन
- बाजारभाव अपडेट : नाशकात टोमॅटो जोरात; वाचा, संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- बाजारभाव अपडेट : ‘त्या’ठिकाणी हरभरा 7,000 वर; वाचा संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- बाजारभाव अपडेट : तूर 7,000 च्या पार; वाचा राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : पुण्यात ज्वारी 5000 ने; पहा, संपूर्ण राज्यातील मार्केट रेट