Take a fresh look at your lifestyle.

त्याकाळी 14 व्या वर्षी बंदूक, 18 व्या वर्षी चारचाकी मिळवणार्‍या मुलाने रचला समाजकारणाचा इतिहास; वाचा बाबा आमटेंची कहाणी

मुरलीधर देवीदास आमटे उर्फ बाबा आमटे. महाराष्ट्रात बाबा आमटे हे नाव माहिती नसेल असा एकही माणूस आपल्याला शोधून सापडणार नाही. बाबा आमटे यांचा जन्म २६ जानेवारी १९१४ साली हिंगनघाट येथे झाला. मात्र उभ्या जगाला त्यांचे परिचित असणारे नाव म्हणजे बाबा आमटे. आदिवासी भगत जाऊन कित्येक लोकांची माय माऊली झालेल्या या माणसाला बाबा हे नाव तितकेच साजेसे वाटते. कुटुंबात एकुलते एक आपत्य असणार्‍या बाबा आमटेंचे घरात खूप लाड व्हायचे. वयाच्या १४ व्या वर्षी त्यांना वडिलांनी एक बंदूक भेट दिली होती. इतकेच नव्हे तर देशभरात क्रेझ असणारी अॅम्बेसिडर गाडी भेट दिली होती ते सुद्धा वयाच्या १८ व्या वर्षी. अशा पायाजवळ सगळे सुख लोळण घालत असताना सुद्धा त्यांनी जे सामाजिक काम केल त्याला तोड नाही. वर्ध्यातून त्यांनी कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. त्यांची आणि महात्मा गांधी यांची पहिली भेट ही वर्ध्यात सेवाग्राम येथे झाली.

Advertisement

महात्मा गांधी यांच्या व्यक्तिमत्वाचा बाबा आमटे यांच्यावर मोठा प्रभाव पडला. गांधीजींच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी पुढे स्वातंत्र्य संग्रामात सहभाग नोंदवला. अनेक नेत्यांच्या तुरुंगवासाच्या दरम्यान त्यांनी कायद्याची बाजू बाबा यांनी सांभाळली होती. महात्मा गांधी यांनी त्यांना अभय साधक म्हणून बोलावत असत. 

Advertisement

बाबा आमटे यांच्या कामाची जगभरात जी ओळख आहे ती कुष्ठरोग्यांची सेवा केलेल्या कामाच्या मुळे असे म्हणाला हरकत नाही. मात्र त्यांना त्यांच्या कामाला पहिली मदत केली ती नोर्मा शेअरर यांची मिळाली. त्यांची ओळख तशी जुनीच म्हणावी लागेल. बाबांना लहानपणी हॉलीवुडच्या चित्रपटांची खूप आवड होती. त्यांनी अनेक चित्रपटांच्या साठी नियतकालिका मध्ये त्यांनी चित्रपटांचे परीक्षण लिहीत असत. जगभरातील कलाकारांशी त्यांचा नियमित पत्रव्यवहार होत असे. यातूनच त्यांना पहिली मदत ही नोर्मा शेअरर यांनी केली. कुष्ठरोग्यांच्या सेवेच्या साठी त्यांनी जे काम केल त्या कडे त्यांच्या वळण्याचा किस्सा की एक दिवस त्यांनी हातपाय झडलेला, भर पावसात भिजत असलेला माणसाचे दृश्य पाहिले आणि हेच दृश्य त्यांच्या मनावर इतके भिनले गेले की त्यांनी कुष्टरोग्यांच्या साठी काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी त्यांच्या पत्नी साधना यांनी रंग भरले.  यातूनच पुढे आंनंदवन उभा राहिले. जिथून हजारो लोकांच्या जीवनात खर्‍या अर्थाने आनंद बाबा आमटे यांनी भरला. अशा कित्येक रोग्यांच्या आयुष्यात आनंद भरणार्‍या पद्मश्री, पद्मविभूषण, गांधी शांतता परितोषिक, रॅमन मगसेसे पुरस्काराने सन्मानित केल्या गेलेल्या बाबा आमटे यांना स्मृति दिनाच्या निमित्त विनम्र अभिवादन.

Advertisement

संपादन : गणेश शिंदे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply