Take a fresh look at your lifestyle.

बाटलीबंद पाणी विकणार्‍या ‘या’ माणसाने अंबांनींना सोडले पाठीमागे; वाचा, आशिया खंडात नंबर 1 असणार्‍या उद्योजकाची कहाणी

अंबानी म्हटले की आपल्या चेहर्‍यासमोर येतो असा चेहरा जो आशिया खंडात अव्वल श्रीमंत व्यक्ती आहे. मात्र आता एका बाटलीबंद पाणी विकणार्‍या माणसाने अंबांनींना पाठीमागे टाकले आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार (Bloomberg Billionaires Index) मुकेश अंबानी यांना मागे टाकत चीनचा एक बडा उद्योजक  झोंग शशान हे आशियातील क्रमांक १ चे व्यक्ती बनले आहेत.

Advertisement

ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार आता चिनी व्यापारी झोंग शशान हा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाला आहे. यासह ते जगातील 11 व्या क्रमांकाचे श्रीमंत माणूसही ठरले आहेत. झोंग हे बाटलीबंद पाणी आणि कोरोना लस यासारख्या व्यवसायांशी संबंधित आहे. त्यांचा व्यवसाय पत्रकारिता, मशरूम लागवड आणि आरोग्यासाठी विस्तृत आहे. त्यांची एकूण संपत्ती यावर्षी 70.9 अब्ज डॉलर्सवरून वाढून 77.8 अब्ज डॉलरवर गेली आहे.

Advertisement

Bloomberg Billionaires Index च्या एका नवीन अहवालानुसार, इतक्या वेगाने कोणाच्याही संपत्तीत वाढ होण्याची ही सर्वात पहिली नोंद आहे, मागच्या वर्षीपर्यंत ते चीनच्या बाहेर फारसे लोकांना माहितीही नव्हते. झोंग शशान यांनी इतकी मोठी झेप घेतली आहे की त्यांनी थेट आशियातील सर्वात श्रीमंत माणूस मुकेश अंबानी आणि चीनमधील श्रीमंत अलिबाबाचा जॅक मा यांनाही मागे सोडले आहे. मुकेश अंबानी यांची संपत्ती यावर्षी 18 अब्ज डॉलर्सने वाढली आहे आणि ते 76.9 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह आशियातील श्रीमंतांच्या यादीत दुसर्‍या स्थानावर पोहोचले आहेत.

Advertisement

‘लोन वुल्फ़’ (एकटा लांडगा) म्हणून ओळखल्या जाणार्‍या झोंगला दोन कारणांनी यश मिळाले. प्रथम, एप्रिलमध्ये त्यांनी बीजिंग वांताई बायोलॉजिकल फार्मसी एंटरप्राइज कंपनीत( Beijing Wantai Biological Pharmacy Enterprise Co.) लस बनवली. तसेच बाटलीबंद पाणी बनवनारी नोंगफू स्प्रिंग कंपनीही खूप लोकप्रिय झाली. हाँगकाँगमधील ही सर्वात लोकप्रिय कंपन्यांपैकी एक बनली. नॉन्गफूच्या शेअर्सच्या सुरूवातीपासूनच 155% वाढ झाली. आणि Wantai ने  2,000 टक्क्यांहून अधिक उडी घेतली आहे.

Advertisement

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply