दिल्ली :
उत्तराखंड येथील चमोली भागात हिमनग तुटून झालेल्या दुर्घटनेने शेकडो लोकांचे बळी गेले आहेत. तसेच नव्यानेच उभारलेले धरण आणि जलविद्युत केंद्राचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झालेले आहे. आता त्यावर माजी केंद्रीय जल संसाधन मंत्री व भाजपच्या जेष्ठ नेत्या उमा भारती यांनी ट्विटरवर त्यांची भूमिका मांडली आहे.
भारतात कोणतीही दुर्घटना घडण्यासाठी जर एखादा व्यक्ती किंवा खासगी संस्था व संघटना जबाबदार असली की कारवाईचे इमले रचले जातात. मात्र, केंद्र सरकार, राज्य सरकार, मंत्री व प्रशासकीय धुरीण यासाठी बेजबाबदार वागल्यास त्यांना काहीही होत नाही. आताही चमोली येथील दुर्घटनेची जबाबदारी कोणावरही टाकलेली नाही, ना कोणीही घेतलेली नाही. त्यामुळे उमा भारती यांचे ट्विट यासाठी महत्वाचे आहे.
त्यांनी म्हटले आहे की, यासंदर्भात मंत्री असतानाच हिमालयीन उत्तराखंडच्या धरणासंदर्भात माझ्या मंत्रालयाने दिलेल्या प्रतिज्ञापत्रात, आम्ही विनंती केली होती की हिमालय हे अतिशय संवेदनशील ठिकाण आहे. म्हणून गंगा व तिथल्या मुख्य उपनद्यांवर वीज प्रकल्प बांधू नयेत. आणि यामुळे झालेल्या उत्तराखंडच्या 12% लोकांचे नुकसान राष्ट्रीय पॉवर ग्रीडद्वारे वीज देऊन भरून काढावे.
उमा भारती यांनी यानिमित्ताने शास्त्रीयदृष्ट्या नेमके काय चुकले आहे यावरच नेमके बोट ठेवले आहे. पर्यावरणाचा आणि जमिनीचा अभ्यास करून असे मोठे प्रकल्प उभारणीसाठीची कार्यवाही झालेली नसल्याकडे त्यांनी बोट दाखवले आहे. परिणामी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या सरकारमधील जबाबदार मंत्री, प्रशासकीय अधिकारी यांच्याच चुकीमुळे ही दुर्घटना घडल्याकडे त्यांनी काहीही न म्हणता लक्ष वेधले आहे. त्यावर केंद्र सरकार किंवा भाजपने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
दरम्यान, नागरिकांना वाचवण्याचे काम सुरू असून स्थानिक प्रशासन व केंद्र सरकार त्याकडे लक्ष ठेऊन आहेत.
संपादन : सचिन मोहन चोभे
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- बाजारभाव अपडेट : कांद्याच्या भावात घसरण; वाचा, राज्यात कुठे, किती मिळतोय दर
- मार्केट अपडेट : ज्वारीच्या भावात घसरण; वाचा, राज्यातील मार्केट रेट
- बाजारभाव अपडेट : हरभरा 6400 वर; वाचा संपूर्ण राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : तूर 7,300 च्या पार; वाचा, संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभाव
- बाजारभाव अपडेट : पुण्यात द्राक्षाला 9000 भाव; वाचा, संपूर्ण राज्यातील मार्केट रेट