Take a fresh look at your lifestyle.

अंबानींच्या ‘जिओ’ला टक्कर देणार ‘या’ बड्या उद्योजकाची कंपनी; वाचा, टेलिकॉम सेक्टरमध्ये कोण मारणार एंट्री

दिल्ली :

Advertisement

रिलायन्सची कंपनी जिओ ही नेहमीच काही न काही धमाका करत असते. महिनाभरापूर्वीही जिओने एक बडा धमाका केला होता. ज्यामुळे मार्केटमध्ये जिओची चलती असल्याचे दिसून आले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीयलची टेलिकॉम आर्म रिलायन्स जिओ अद्याप 5 वर्षाचीही झालेली नाही. अशातच एका सर्वेनुसार जिओ हा जगातील 5 वा सर्वात मजबूत ब्रँड बनला आहे. अशातच जिओला एक मोठा स्पर्धक उभा राहणार असल्याचे वृत्त आहे.

Advertisement

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अशी ओळख असलेले एलन मस्क हे आता भारतीय टेलिकॉम सेक्टरमध्ये एंट्री मारणार आहेत. सध्या विविध क्षेत्रात अनेक बड्याबड्या उद्योजकांना मस्क हे आपल्या तंत्रज्ञानाच्या जोरावर आव्हान देत असतात. लॉकडाउनच्या दरम्यान अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेजोस यांना मागे टाकून एलन मस्क हे श्रीमंतांच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचले. आता याच एलन मस्क यांनी रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या अडचणीत वाढ केली आहे.

Advertisement

एलन मस्क यांची कंपनी स्पेसएक्स ने देशात व्यापार करण्यासाठी परवानगी मागितली आहे. मस्क हे भारतात व्यापार करण्याचा प्रयत्न करणार आहेत. यासाठी स्टारलिंक प्रोजेक्ट बेस्ड देशाची सरकारकडून परवानगी मागितली आहे. 

Advertisement

‘या प्रोजेक्टमुळे देशात जबरदस्त नेटवर्क कनेक्टिविटी मिळणार आहे. कंपनीने स्टार लिंक प्रोजेक्ट अंतर्गत अंतराळात १२ हजार नेटवर्क सॅटेलाइट पाठवण्याची योजना बनवली आहे. यामुळे भारतीयांना जबरदस्त कनेक्टिविटी मिळू शकते’, अशी माहिती मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीच्या अधिकार्‍यांनी दिली आहे.

Advertisement

संरपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply