Take a fresh look at your lifestyle.

पुढच्या निवडणुकीत घरी बसवलं नाही तर माझ्या बापाची अवलाद नाही; माजी आमदार जावयाने दिला मंत्री असलेल्या सासर्‍यांना इशारा

औरंगाबाद :

Advertisement

कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि त्यांचे सासरे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यात सुरू झालेला वाद शमला आहे, असे वाटत असताना पुन्हा एकदा जावई जाधव यांनी सासर्‍यांना गंभीर इशारा दिला आहे. दरम्यान जाधव यांनी उचललेल्या या पाउलामुळे हा वाद अजूनही सुरू असल्याचे समोर आले आहे.

Advertisement

‘भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना पुढच्या निवडणुकीत घरी बसवलं नाही, तर मी माझ्या बापाची अवलाद नाही. पुढच्या निवडणुकीत रावसाहेब दानवेंना घरी नाही बसवलं, तर की माझ्या बापाची अवलाद नाही. रावसाहेब दानवे यांचा हा दबाव मोडून काढा आणि मला सरंक्षण द्यावं’, असे म्हणत जाधव यांनी दानवेंवर हल्लाबोल केला.    

Advertisement

गेल्या काही महिन्यांपासून कौटुंबिक वाद जाधव यांनी जगजाहीर केले होते. नंतर आपल्याला दानवे यांच्यापासून भीती असल्याचेही सांगितले होते. नंतर त्यांच्यावर झालेल्या गुन्ह्याबद्दल बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, रावसाहेब दानवे यांनी राजकीय दबावाने गुन्हे दाखल केला आहे. ‘राज्य सरकारने यात लक्ष घालावं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही यात लक्ष घालावं,’ अशी मागणी हर्षवर्धन जाधव यांनी केली आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply