Take a fresh look at your lifestyle.

महाभकास सरकारने थोडीतरी लाज बाळगावी; चंद्रकांत पाटलांचा ठाकरे-पवारांना टोला

मुंबई :

Advertisement

शेतकरी आंदोलनास विरोध आणि समर्थन यावरून देशभरात खालच्या पातळीचे राजकारण सुरू आहे. दोन्ही बाजूंनी आपापल्या पद्धतीने वाईटात वाईट राजकारण करण्याची पातळी गाठण्याचा मक्ता घेतला असल्याचे स्पष्ट होत आहे.

Advertisement

यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर कडाडून टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर पाटलांनी टीका केली आहे. त्यांनी ‘महाभकास सरकारने थोडीतरी लाज बाळगावी’, असे आवाहन करताना गानकोकिळा लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर आणि इतरांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असल्याचा आरोप केला आहे.

Advertisement

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरवर सारखे पोस्ट जोण्याच्या प्रकरणाची पोलीस चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यावर पाटलांनी म्हटले आहे की, महाभकास सरकारने थोडीतरी लाज बाळगावी! महाभकास आघाडी सरकार कृषी कायद्याच्या बाजूने ट्विट करणाऱ्या सेलिब्रिटींची चौकशी करणार आहे.हा राष्ट्रीय एकात्मतेसाठी बोलणाऱ्या @mangeshkarlata@sachin_rt यांचा अपमान आहे! भारतमातेसाठी उभे राहणे हा @OfficeofUT@PawarSpeaks यांना गुन्हा वाटतो का?

Advertisement

Chandrakant Patil on Twitter: “महाभकास सरकारने थोडीतरी लाज बाळगावी! महाभकास आघाडी सरकार कृषी कायद्याच्या बाजूने ट्विट करणाऱ्या सेलिब्रिटींची चौकशी करणार आहे.हा राष्ट्रीय एकात्मतेसाठी बोलणाऱ्या @mangeshkarlata व@sachin_rt यांचा अपमान आहे! भारतमातेसाठी उभे राहणे हा@OfficeofUT व@PawarSpeaks यांना गुन्हा वाटतो का? https://t.co/acESUiZ0Ew” / Twitter

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply