Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. आणखी एक हिमनग कोसळण्याच्या मार्गावर; पहा, काय म्हणतायेत संशोधक

दिल्ली :

Advertisement

उत्तराखंडच्या चमोली येथे हिमनग फुटल्यानंतर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अद्याप उत्तराखंडमध्ये सतर्कतेचा इशारा देऊन मदत आणि बचाव कार्य चालू आहे. दरम्यान, संशोधकांनी नवीन इशारा दिला आहे की, आणखी एक ग्लेशियर खंडित होण्याची शक्यता आहे.

Advertisement

आणखी एक हिमनग उत्तराखंडमध्येच तुटून पडू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसेच, जर हा नवा हिमनग कोसळला तर त्याने आणखी अधिक नुकसान होईल. नंदकिनी नदीच्या काठावर असलेल्या शिलासमुद्र हिमनदीच्या काठावरील भागात अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. त्यातून अनेक ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता पर्यावरणतज्ज्ञांना वाटत आहे.

Advertisement

नंदाकिनी नदीच्या काठावरील शिलासमुद्र हिमनग तुटल्यास चमोली ते हरिद्वारपर्यंत अनेक भागात मोठा विनाश होऊ शकतो. अशा परिस्थितीत पर्यावरण तज्ज्ञांनी केंद्र व राज्य सरकारला इशारा दिला आहे. आता हा हिमनग वैज्ञानिकांच्या देखरेखीखाली आला आहे. चमोली जिल्हा आसपासच्या हिमनदीने वेढलेला आहे. अशा परिस्थितीत हिमनग तुटल्यानंतर नंदप्रयाग, सितेल, कनोल, घाट आणि कानोल ते हरिद्वारपर्यंत विनाश होऊ शकतो. चमोलीत हिमनदी फुटल्यानंतर बेपत्ता झालेल्या लोकांसाठी सध्या बचावकार्य सुरू आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply