वेदनेसाठी वापरला जाणारा ‘हा’ पदार्थ बुद्धी तल्लख करण्यासाठीही आहे उपयोगी; वाचा, महत्वपूर्ण माहिती
आयुर्वेद शास्त्रानुसार हळद पोटदुखी निवारक, रक्तशुद्धीकारक, बलवर्धक, कृमीनाशक आम्लपित्तहारक, भूक उद्दीपीत करणारी आहे. हळदीमुळे त्वचेचा रंग उजळतो तसेच ती रक्तशुद्धीसाठी गुणकारी आहे. जगातील उत्पादनापैकी जवळजवळ ८०% उत्पादन भारतामध्ये होते, परंतु त्यापैकी १५ ते २० % फक्त हळद निर्यात होते. उत्पादनाचा विचार केला असता प्रथम क्रमांक आंध्रप्रदेश असून त्यानंतर ओरिसा, तामिळनाडू आसाम, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा क्रम लागतो.
आपल्या दैनंदिन आयुष्यात हळद वेदनेपासून मुक्ती मिळवण्यासाठी वापरली जाते. तसेच जेवणातही आपण हळदीचा वापर सर्रास करत असतो. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, बुद्धी तल्लख करण्यासाठीही हळद उपयोगी आहे.
जाणून घ्या फायदे :-
- सकाळी गरम पाण्यात हळद टाकून पिणे हे आपल्या बुद्धीच्या वाढीसाठी महत्वाचे ठरते.
- शरीरावर सूज आल्यास, पाय मुरागळा, जखम यासाठी प्रामुख्याने घरगुती उपायात हळद वापरली जाते.
- हळदीत असे काही घटक पदार्थ असतात जे कर्करोगाशी म्हणजे कॅन्सरपासून आपल्याला दूर ठेवतात.
- हळद रोज खाल्ल्याने पित्त वाढते, त्यामुळे जेवण पचण्यास मदत होते.
- हळदीचे पाणी प्यायल्याने रक्त गोठत नाही. रक्त साफ होण्यासही मदत होते.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- ‘त्या’ लोकप्रिय अॅपद्वारे घुसतोय मालवेअर; पहा कोणती आहेत धोकादायक अॅप्लिकेशन
- बाजारभाव अपडेट : नाशकात टोमॅटो जोरात; वाचा, संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- बाजारभाव अपडेट : ‘त्या’ठिकाणी हरभरा 7,000 वर; वाचा संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- बाजारभाव अपडेट : तूर 7,000 च्या पार; वाचा राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : पुण्यात ज्वारी 5000 ने; पहा, संपूर्ण राज्यातील मार्केट रेट