जिल्हा बँक निवडणूक : भाजप सहकारात पाठीमागेच; ‘त्या’ एका नेत्याच्या जिवावर भाजपचा डोलारा
अहमदनगर :
विधानपरिषद आणि शिक्षक मतदारसंघात भाजप पूर्णपणे पिछाडीवर गेला कारण महाविकास आघाडीच्या ताकदीसमोर भाजप उमेदवारांचा निभाव लागू शकला नाही. अगदी भाजपचा बालेकिल्ला नागपुरमध्येही भाजपला पराभव स्वीकारवा लागला. शिक्षणसंस्था, साखर कारखाने, बँका आणि इतर सहकारी तत्वावर चालणार्या संस्थात भाजप पाठीमागे आहे. सध्या नगर जिल्हा बँक निवडणुकीतही भाजपला सहकारात पाठीमागे राहण्याचा झटका बसणार आहे.
निवडणूक जाहिर झाल्यावर विरोधीपक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा निवडणुकीत भाजपचा झेंडा रोवण्यासाठी भाजप नेत्यांची एक समिती गठित करण्यात आली. माजी मंत्री राम शिंदे, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले व आमदार राधाकृष्ण विखे पाटील हे या समितीचे प्रमुख होते. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने माजी मंत्री राम शिंदे हे राजकरणात काहीसे निराश दिसत आहेत. अशातही जिल्हा बँक निवडणुकीसाठी त्यांच्याकडे काहीच तयारी नसल्याचे बोलले जात आहे.
माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनीही प्रथमच पराभव पहिल्याने आता अस्तित्वाचा प्रश्न म्हणून ते या निवडणुकीकडे पाहत आहेत. कर्डिले यांनी तर थेट मंत्री बाळासाहेब थोरात गटाचा रस्ता धरला आहे. कर्डिले यांच्यासाठी ही निवडणूक अतिशय महत्वाची समजली जात आहे. हे दोन्हीही नेते मागे पडत असल्याने महाविकास आघाडीविरुद्ध एकाकी पडलेले विखे असा संघर्ष जिल्हा बँक निवडणुकीत दिसणार आहे.
नगर जिल्ह्याच्या राजकरणात विखे हे स्वत:च पक्ष असल्याचे बोलले जाते. मात्र आता या निवडणुकीत विखे हे स्वत:च पक्ष आहेत की नाहीत, हे समोर येईलच.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- म्हणून असतो हायवेच्या दिशा दाखवणाऱ्या फलकांचा रंग हिरवा; वाचा भन्नाट आणि रंजक माहिती
- ‘त्या’ शिक्षक, कर्मचाऱ्यांना खुशखबर; वेतन आयोगाबाबत सरकारने केली मोठी घोषणा
- पुन्हा मिळणार नाही सोने खरेदीची ही संधी; सलग आठव्या दिवशी सोन्याच्या दरात ‘एवढी’ घसरण, वाचा ताजे भाव
- देशात पहिल्यांदाच सुरू झालीय गाढवाच्या दुधाची डेअरी; दूध विकले जातेय ‘एवढ्या’ किमतीला; वाचा, भन्नाट स्टोरी
- दूध पिताना ‘या’ नक्कीच गोष्टी ठेवा लक्षात; अन्यथा…