Take a fresh look at your lifestyle.

‘मी पुन्हा येईन’ : जिल्हा बँकेत ‘त्या’ उमेदवारांचा नारा, पहा काय आहे उमेदवारांची परिस्थिती

अहमदनगर :

Advertisement

‘मी पुन्हा येईन’ ही घोषणा आजही महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला माहिती आहे. या घोषणेत अहंकार होता की नाही?, हे येणारा काळच ठरवेल. मात्र आता सहकारचे केंद्रस्थान असलेली आणि महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांचे ज्या निवडणुकीकडे लक्षं आहे ती जिल्हा बँकेची निवडणूक पुन्हा रंगणार आहे. अगदी मंत्री आणि आमदारही या बँके निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत.

Advertisement

निवडणूक जाहिर झाल्यावर भाजप कामाला लागली, असे चित्र होते. मात्र प्रत्यक्षात भाजप महाविकास आघाडीसमोर खूपच मागे पडताना दिसत आहे. मात्र ‘मी पुन्हा येईन’चा नारा देत सर्वपक्षीय उमेदवारांनी पुन्हा संचालक होण्यासाठी कंबर कसली आहे. विकास सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून पुन्हा एकदा माजी संचालकांनी निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी केली आहे.

Advertisement

एका तालुक्यातून 1 संचालक असे समीकरण असले तरीही प्रत्येक तालुक्यात मात्तबर नेत्यांनी अर्ज दाखल केले आहेत. जवळपास 12 तालुक्यातील माजी संचालकांनी पुन्हा अर्ज दाखल केल्याने ‘मी पुन्हा येईन’चा नारा अप्रत्यक्षपणे सर्वांनी दिले आहे. या निवडणुकीत सगळ्यांसाठी चुरशीची ठरणार आहे. कारण सहकारासाठी नावाजलेल्या या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राज्यातील नेत्यांनी उडी घेतली आहे.

Advertisement

अगदी जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षांनासुद्धा आता ही निवडणूक जड जाणार आहे. कारण त्यांच्याविरोधात 2 तगड्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. जलसंधारण मंत्री शंकरराव गडख हे नेवाशातून तर आमदार आशुतोष काळे कोपरगावमधून, आमदार नीलेश लंके पारनेरमधून तर विधान परिषद सदस्य अरुण जगताप यांनी बिगरशेती मतदारसंघातून अर्ज दाखल केला आहे.     

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply