मुंबई :
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 2021-22 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प नुकताच सादर केला. यात केंद्र सरकारने सोने आणि चांदीवरील कस्टम ड्यूटीत कमी केली आहे. याचाच थेट परिणाम सोन्याच्या आणि चांदीच्या दरावर झाला असून सोन्याचांदीच्या दरात गेल्या आठवड्यापासून घसरण झाल्याचे दिसत आहे.
असे आहेत महत्वाच्या शहरातील आजचे बाजारभाव :-
मुंबई (२२ कॅरेट) – ४६१६० (प्रती १० ग्राम)
मुंबई (२४ कॅरेट) – ४७१६० (प्रती १० ग्राम)
पुणे (२२ कॅरेट) – ४६१६० (प्रती १० ग्राम)
पुणे (२४ कॅरेट) – ४७१६० (प्रती १० ग्राम)
दिल्ली (२२ कॅरेट) – ४६२१० (प्रती १० ग्राम)
दिल्ली (२४ कॅरेट) – ५०४१० (प्रती १० ग्राम)
चेन्नई (२२ कॅरेट) – ४४७०० (प्रती १० ग्राम)
चेन्नई (२४ कॅरेट) – ४८७३० (प्रती १० ग्राम)
कोलकाता (२२ कॅरेट) – ४६७९० (प्रती १० ग्राम)
कोलकाता (२४ कॅरेट) – ४९४९० (प्रती १० ग्राम)
सोन्याच्या दरात सध्या चालू असलेली घसरण ही किरकोळ ग्राहकांसाठी मात्र खरेदीची संधी आहे. एसएमसी ग्लोबलच्या कमॉडिटी विश्लेषक वंदना भारती यांनी सांगितले की, बॉण्ड यिल्डमध्ये जोपर्यंत घसरण होत नाही तोवर सोन्याच्या तेजीसाठी पोषक वातावरण तयार होणार नाही. पृथ्वी फिनमार्टचे कमॉडिटी विश्लेषक मनोज कुमार जैन यांनी सांगितले की, २०१९ मध्ये ६९०.४ टन सोने आयात करण्यात आले होते. सोन्याला ४७२०० रुपयांच्या स्तरावर सपोर्ट आहे. येत्या काही महिन्यात सोन्याची मागणी वाढल्याचे दिसून येईल.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- PM मोदी आणि सीतारामन यांच्या आकडेवाडीत कोट्यावधींची तफावत; वाचा, नेमका कुठे झालाय घोळ
- मोठी बातमी… मोदी सरकार ‘या’ क्षेत्रातील शेकडो कंपन्या विकणार
- मराठा आरक्षण उपसमितीने घेतला सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या तयारीचा आढावा; वाचा, काय आहे परिस्थिती
- आता 7/12 आणि घरावर लागणार पत्नीचे नाव; महिलांनो, तुमच्या फायद्याची ही योजना घ्या समजून
- अवघ्या ६९ रुपयात मिळवा गॅस सिलिंडर; त्यासाठी करावे लागेल ‘हे’ एकच काम