मुंबई :
आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे कोकणात वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेसाठी आले होते. कणकवली येथे झालेल्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह शिवसेनेवर टीका केली. आपण उद्धव ठाकरे यांना कधीच मुख्यमंत्रीपदाचे वचन दिले नव्हते, तुम्ही म्हणता की मी बंद खोलीत वचन दिले. मात्र मी बंद खोलीत कधीही वचन देत नसतो, तर खुलेआम वचन देतो, असे म्हणत शाह यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.
याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या सडेतोड शैलीत शहांना सुनावले आणि या विषयावर पडदा टाकण्याचे सुचवले आहे. अमित शहांनी शिवसेनेवर केलेल्या दगाबाजीच्या आरोपावर देखील अजित पवारांनी भाष्य केले. जाऊ द्या कशाला शिळ्या कढीला ऊत आणता. स्वतः उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. बंद दारा आड काय घडले हे सांगायला मी काही ज्योतिषी नाही, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्रिपदाबाबत शिवसेनेशी कोणत्याही प्रकारचे बोलणे झालेले नाही, सांगतानाच यांनी पंतप्रधान मोदी यांची मोठी पोस्टर्स लावून तत्वासाठी मते मागितली. त्यावेळी आम्ही मंचावरून आमचे नेते देवेंद्र फडणवीस आहेत, ते मुख्यमंत्री बनतील असे सतत सांगत होतो. त्यावेळी तुम्ही काही का बोलला नाहीत, असा सवाल अमित शाह यांनी उपस्थित केला होता.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार उचलणार ‘ते’ पाऊल; बघा, नेमकं काय म्हणालेत अशोक चव्हाण
- कोलकाताच्या ‘या’ दुकानात 1 चहा मिळतोय हजार रुपयाला; जाणून घ्या काय आहे या चहाची खासियत
- अर्थसंकल्पानंतर ‘या’ शेअर्सने भरले गुंतवणुकदारांचे खिसे; एका महिन्यात दिला तब्बल 150% परतावा
- रॉम्पस+ ईव्ही स्कूटर या पॉवरफुल सायकलबद्दल आहे का तुम्हाला ‘ही’ माहिती; वाचा की मग महत्वाची माहिती
- म्हणून ‘त्यावेळी’ तपासली होती युवराजची बॅट; पहा कोणी आणि का केले होते असे कृत्य