Take a fresh look at your lifestyle.

टीका भाजपवर मात्र काँग्रेस पडली तोंडघशी; वाचा, नेमकी ‘अशी’ कशी टीका केली संजय राऊतांनी

मुंबई :

Advertisement

आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे कोकणात वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेसाठी आले होते. कणकवली येथे झालेल्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह शिवसेनेवर टीका केली. याला प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी अशी उदाहरणे दिली की, ज्यामुळे भाजपला टीका लागण्याऐवजी काँग्रेसवरच आगपखाड केल्यासारखे वाटले.

Advertisement

शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी म्हटले की, 1975 साली काँग्रेस नेत्या रजनी पटेल तर 1990 मध्ये बहुधा मुरली देवरा यांनी शिवसेना लवकरच संपणार, असे भाकीत केले होते. मात्र  तसे घडले नाही. नंतर पुढे जाऊन 2012 मध्ये माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही याच गोष्टीचा पुनरुच्चार केला. मात्र, 1975 पासून आजवर जेव्हा जेव्हा शिवसेना संपेल असे म्हटले गेले त्या त्या वेळी शिवसेना अधिक जोमाने वाढली.

Advertisement

या टीकेने अमित शहांना उत्तर तर मिळाले. मात्र सध्या शिवसेनेसोबत महाविकास आघाडीमध्ये असणार्‍या काँग्रेस नेत्यांना तोंडावर पडल्यासारखे झाले. आता काँग्रेस नेते यावर काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे जास्त महत्वाचे आहे. काँग्रेस नेते नाराज होण्याची शक्यता सांगितली जात आहे.

Advertisement

नेमकं काय म्हणाले होते अमित शहा :-

Advertisement

शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे यांच्या तत्वांना तापी नदीत बुडवले आणि सत्तेवर जाऊन बसले. आम्ही शिवसेनेच्या मार्गाने चालत नाही. शिवसेनेच्या मार्गाने चाललो असतो तर महाराष्ट्रात शिवसेनाच उरली नसती.    

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply