Take a fresh look at your lifestyle.

म्हणून ‘लाईफटाईम’साठी गृहमंत्री शहांना बोलावले; पहा नेमके काय म्हटलेय राणेंनी ते

मुंबई :

Advertisement

माजी मुख्यमंत्री व भाजप नेते नारायण राणे यांच्या सिंधुदुर्गातील ‘लाईफटाईम’ या वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाले. त्यावेळी राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर जोरदार टीका केली.

Advertisement

राणे म्हणाले की, विकास कामांना विरोध आणि उद्धाटनाला आयत्या बिळावर नागोब म्हणजे शिवसेना हा पक्ष आहे. या महाविद्यालयाचा दगड ठेवला तेव्हापासून शिवसेनेकडून खूप विरोध झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नवे रुग्णालय उभारण्यासाठी 900 कोटी रुपये देण्याचीही घोषणा केली.

Advertisement

अनेक विरोध आणि वाद झाले तरी वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले. अमित शाह यांना उद्घाटनाला बोलावण्यामागे आमच्या काही भावना होत्या. त्यामुळे उद्घाटनाला डेअरिंगवाला माणूस हवा, अशी मागणी सर्वांची होती. म्हणूनच मी दिल्लीत जाऊन अमित शहा यांना विनंती करून उद्घाटनाला बोलावले, असे राणे यांनी म्हटले आहे.

Advertisement

राणेंनी शिवसेना आणि ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हटले की, कोकणात विमानतळ होणार होते तेव्हाही विरोध करत आंदोलन करणारी शिवसेनाच होती. विकास कामांना विरोध करायचा आणि उद्धाटनांना आयत्या बिळावर नागोबासारखे येऊन बसायचे, यालाच शिवसेना म्हणतात.

Advertisement

संपादन : संतोष वाघ  

Advertisement

भाजपा महाराष्ट्र on Twitter: “आज देशाचे गृहमंत्री श्री @AmitShah यांनी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात लाईफटाईम मेडिकल कॉलेजचे उद्गाटन केले. यावेळी विरोधी पक्षनेते @Dev_Fadnavis,प्रदेशाध्यक्ष @ChDadaPatil,खासदार @MeNarayanRane , @mipravindarekar व पदाधिकारी उपस्थित होते. https://t.co/nEncGaZnxi” / Twitter

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply