Take a fresh look at your lifestyle.

फडणवीसांची मिळेना विखेंना साथ; मग भाजप कशी देणार आघाडीला मात..!

अहमदनगर :

Advertisement

सध्या नगर जिल्ह्याचे राजकारण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीवर केंद्रित झालेले आहे. गावोगावी सरपंच पदाच्या निवडीपेक्षा बँकेत संचालक म्हणून कोण जाणार आणि मतदारांना कोणते घबाड मिळणार या चर्चेत भाजप मात्र, महाविकास आघाडीपेक्षा बॅकफूटवर असल्याचे चित्र आहे.

Advertisement

निवडणूक जाहीर होताना सुरुवातीलाच माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत बैठक घेऊन जोरात कामाला लागण्याचे निर्देश दिले होते. त्यासाठी ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री राम शिंदे आणि शिवाजी कर्डिले यांच्या तिघांची कोअर कमिटी जाहीर झाली होती. मात्र, पुढे कर्डिले यांनी विखे, शिंदे यांच्या कमिटीची साथ सोडून थेट महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या बैठकीस हजेरी लावली होती.

Advertisement

Krushirang on Twitter: “@BJP4Maharashtra @Devendra_Office @Dev_Fadnavis @RVikhePatil @drsujayvikhe #Ahmednagar #Politics https://t.co/yJPeD8i5T7” / Twitter

Advertisement

सध्या फडणवीस यांनी या निवडणुकीतून पूर्णपणे अंग काढून घेतले आहे. भाजप नेते शिंदे यांच्याकडे या निवडणुकीसाठी विशेष तयारी नाही, तर कर्डिले थेट महाविकास आघाडीच्या संपर्कात आहेत. परिणामी आता विखे गट एकाकी झाला आहे. त्यात महाविकास आघाडीकडून ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेही लक्ष घालून आहेत. परिणामी विखे एकटेच आघाडीच्या मंडळींना कसे पुरून उरणार की निवडणूक थेट बिनविरोध होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

मात्र, या निवडणुकीने पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे की, नगर जिल्ह्याच्या सहकाराच्या राजकारणात भाजपची ताकद नाही. त्यात फडणवीस यांना तर इथे आपले कार्यकर्ते उभे करण्यासाठी आणखी जास्त काम करावे लागणार आहे. एकूणच या निवडणुकीने पुन्हा एकदा नगर जिल्ह्यात विखे विरुद्ध सर्वपक्षीय नेते असेच चित्र निर्माण झालेले आहे. त्यातून आता विखे कसा मार्ग काढतात याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply