ठाकरे सरकारचा ‘दणका’; फडणवीसांची ‘ती उद्योगधार्जिणी योजना’ बंद, अडचणीत वाढल्या अडचणी..!
औरंगाबाद :
कोरोना इफेक्टनंतर खासगी उद्योग, व्यवसाय व कंपन्यांचे कामकाज पुन्हा सुरळीत होत असतानाच आता महाविकास आघाडी सरकारने आणखी एक मोठा ‘दणका’ दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील छोटे-मोठे व अडचणीतील उद्योजक कोलमडून पडण्याची भीती व्यक्त होत आहे.
करोनाचा काळात मोठे संकट असतानाही उद्योगासाठी राज्य सरकारकडून काहीही ठोस व भरीव मदत झाली नाही. अशावेळी अनेक उद्योग कोमात जाण्याच्या मार्गावरून बाहेर येण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यात आता मराठवाडा, विदर्भ आणि खान्देश या भागासाठी वीज बिलावर असणारी सबसिडी रद्द करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने उद्योगासमोर वीज बिलाचे नवे संकट उभे केले आहे. आता रोजगार वाढीसाठी उद्योग व्यवस्थित चालण्याची गरज आहे. अशावेळी अशी मदत बंद केल्याने मागास भागात आणखी बेरोजगारी वाढण्याची शक्यता आहे.
चालू बिल अर्थात जानेवारी २०२१ च्या बिलात ही सूट देण्यात आलेली नाही. त्यामुळे मदत नको पण अडचणीत आणू नका, अशा भावना उद्योजकांनी व्यक्त केली आहे. विकसित पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मागास असलेल्या भागात उद्योगांना प्रोत्साहन मिळावे याकरिता तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने २०१७ पासून मराठवाडा, विदर्भ तसेच खान्देश येथील उद्योगासाठी वीज बिलासाठी सबसिडी जाहीर करण्यात आली होती.
मागील २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी राज्य सरकारने १२०० कोटी रकमेचे अनुदान जाहीर केले होते. पण ही मंजूर रक्कम संपल्यामुळे औद्योगिक ग्राहकांना जानेवारी २०२१ च्या वीज बिलात सवलत देण्यात आलेली नाही. राज्य शासनाने याबाबत कोणतीही भूमिका जाहीर केली नसल्यामुळे वीज ग्राहकांना पुढील दोन महिन्यांत ही सवलत मिळणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे उद्योजकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
संपादन : सचिन पाटील
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- बाजारभाव अपडेट : कांद्याच्या भावात घसरण; वाचा, राज्यात कुठे, किती मिळतोय दर
- मार्केट अपडेट : ज्वारीच्या भावात घसरण; वाचा, राज्यातील मार्केट रेट
- बाजारभाव अपडेट : हरभरा 6400 वर; वाचा संपूर्ण राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : तूर 7,300 च्या पार; वाचा, संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभाव
- बाजारभाव अपडेट : पुण्यात द्राक्षाला 9000 भाव; वाचा, संपूर्ण राज्यातील मार्केट रेट