Take a fresh look at your lifestyle.

‘चहाच्या बदनामी’वरुन पंतप्रधान मोदी आक्रमक; म्हणाले…

मुंबई :

Advertisement

आज देशाला बदनाम करण्यासाठी कट रचणारे या स्तरावर पोहोचले आहेत की त्यांनी भारताचा चहाही सोडला नाही. भारताच्या चहाची प्रतीमा मलिन करायची असल्याचं हे कट रचणारे म्हणत आहेत. काही दस्तऐवज समोर आले आहेत. भारताची ओळख ज्या चहाशी आहे त्यावर हल्ला करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचं यातून समोर आलं आहे, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी टुलकिट खुलाशावर भाष्य केले.

Advertisement

पुढे बोलताना ते म्हणाले की, तुम्हाला हे सर्व चालणार आहे का? हा हल्ला करणाऱ्यांचं कौतुक तुम्हाला मान्य आहे का? या सर्व राजकीय पक्षांना भारताचा चहाची बाग असलेलं ठिकाणच उत्तर देईल. भारताच्या चहावर करण्यात येणाऱ्या हल्ल्यांमध्ये इतकी ताकद नाही की ते या चहा कामगारांचा सामना करू शकतील.

Advertisement

यावेळी ते आसाममध्ये बोलत होते. आज मोदींच्या हस्ते आसाममध्ये ७ हजार ७००कोटी रुपयांच्या ‘असोम माला’ प्रकल्पाचाचा शुभारंभ झाला तसेच दोन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यासाठी भूमिपूजन केले. यावेळी भाषणात ते म्हणाले की, आसामच्या भूमीवर या कट रचणाऱ्यांना जे काही कट रचायचे आहेत ते रचू दे. परंतु आम्ही ते यशस्वी होऊ देणार नाही. माझा चहा कामगार ही लढाई नक्कीच जिंकणार.  

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply