Take a fresh look at your lifestyle.

भाजप नेत्याने साधला पवारांवर निशाणा; पवारांनी ‘ते’ केलेलं चालतं मात्र सचिनने…

मुंबई :

Advertisement

शेतकरी आंदोलन आणि कृषी कायदे यावरून देशाच्या राजकीय आणि सामाजिक पटलावरील वातावरण तापलेले आहे. अशातच क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने कृषी कायद्यांच्या समर्थनार्थ ट्विट केले होते. यावरून त्याला खूप ट्रोल करण्यात आले. एवढेच नाही तर  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही सचिनला खडे बोल सुनावले होते. ‘आपलं क्षेत्र सोडून इतर विषयांवर बोलताना सचिन तेंडुलकरने काळजी घ्यावी, असा माझा सल्ला राहिल’, असा टोला पवारांनी सचिनला हानला.

Advertisement

याच पार्श्वभूमीवर आक्रमक झालेल्या भाजप नेते अतुल भातखळकर यांनी पवारांवर उलटप्रहार केला. ‘कृषी मंत्री असताना आपलं शेती क्षेत्र सोडून क्रिकेटच्या आयपीएल स्पर्धा भरवलेल्या चालतात. पण सचिनने राष्ट्रहिताच्या बाजूने आपलं मत मांडलं ते ‘राष्ट्रवादी’ काँग्रेसच्या अध्यक्षांना चालत नाही’, असे म्हणत भातखळकर यांनी सचिनची बाजू लावून धरली आहे.

Advertisement

काय होते सचिनचे ट्विट :-

Advertisement

भारताच्या सार्वभौत्मासंदर्भात कसल्याही प्रकराची तडजोड केली जाऊ शकत नाही. भारताच्या अंतर्गत बाबतीत बाहेरील शक्ती केवळ प्रेक्षक असू शकतात, ते याचा भाग होऊ शकत नाहीत. भारतातील नागरिक भारताला चांगले ओळखतात, यामुळे त्यांनीच भारतासंदर्भात निर्णय घ्यायला हवेत. देश एकसंध रहायला हवा.

Advertisement

त्यावर पवार म्हणाले :-

Advertisement

आपलं क्षेत्र सोडून इतर विषयांवर बोलताना सचिन तेंडुलकरने काळजी घ्यावी, असा माझा सल्ला राहिल. इतके दिवस शेतकरी जर रस्त्यावर बसतायत तर त्याचा विचार करायला पाहीजे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत आता आंतरराष्ट्रीय स्तरावरून प्रतिक्रिया येत आहेत. हे खरं तर चांगलं नाही.  

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply