Take a fresh look at your lifestyle.

वाढदिवस विशेष : ‘असेही बाळासाहेब’; वाचा, बाळासाहेब थोरातांची कधीच समोर न आलेली बाजू

अहमदनगर :

Advertisement

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि महाविकास आघाडीची मोट बांधण्यात सिंहाचा वाटा असलेले मविआचे मंत्री बाळासाहेब थोरात यांचा आज वाढदिवस आहे. दिशाहीन महाराष्ट्र काँग्रेसला मार्ग दाखवणार्‍या बाळासाहेब थोरातांविषयी आज प्रत्येक सामान्य काँग्रेस कार्यकर्त्याला आदर आहे. सोशल मीडियावर अनेक काँग्रेस नेते व कार्यकर्ते थोरात यांच्याविषयी लिहीत आहेत. अशावेळी एखाद्या तटस्थ पत्रकाराने थोरात यांच्याविषयी वाढदिवसाच्या निमित्ताने लिहिलेले आपण वाचने महत्वाचे आहे.

Advertisement

पुणे येथील पत्रकार प्रशांत आहेर लिहितात की, सर, तुम्ही खूप भारी आहात. एक पिता, पती आणि नेता म्हणून. खूप दिवस तुमच्याशी बोलावं, असे वाटतं होते. परंतु, आपण आपल्या वडीलांशी मनमोकळेपणे बोलू शकत नाही ना… तशीच अवस्था माझी तुमच्याशी बोलताना होते. राजकीय बातमीदारी करताना राज्यातील इतर नेत्यांना उलट-पालटे प्रश्न विचारताना, मला कुठलीही भीती वाटतं नाही. अगदी जेष्ठ नेते पवार यांच्याबाबतही होत नाही. परंतु, तुम्ही समोर असाल तर तो आदर कायम असतो आणि माझ्या तोंडून चुकून प्रश्न फुटतो. इतर कोणाही बाबत, असे मला झालेले नाही.

Advertisement

आज तुमचा वाढदिवस म्हटलं तुम्हाला मेसेज तरी करावा आणि मनातलं बोलता आले तर ते लिहावं. सर, खूपदा असे वाटत की इतकं गलिच्छ राजकारण आजूबाजूला सुरू असताना तुम्ही स्थितप्रज्ञ कसे राहता?  सगळ्यात राहूनही निराळे कसे असता? तुमचे कमी बोलणे, संयम आणि निस्वार्थीपणा ही तुमची बलस्थानं दिसली. अगदी तुमच्याकडे सुरुवातीला चालून आलेले महसूल मंत्री पद तुम्ही पतंगराव कदम साहेबांना अगदी अलगद दिलं, यात मनाचा खूप मोठेपणा लागतो. राज्यात दुय्यम स्थानावर नेतृत्व करताना तुमच्या प्रामाणिकपणामुळे तुम्ही राज्यातील काँग्रेसचे एकमेव नेतृत्व बनलात. सध्याच्या काँग्रेसला प्रदेशाध्यक्ष येतील, जातील मात्र काँग्रेसचे नेतृत्व तुमच्याकडं हे वादातीत कायमच असेल. प्रश्न नेतृत्वाचा नाही तर, तुमच्या दूरदृष्टीचा आहे.

Advertisement

दुष्काळी संगमनेर तालुक्याला तुम्ही शेततळ्यांच्या माध्यमातून बारमाही केले. दूध उत्पादनातून घरोघरी माऊलीच्या हातात पैसे दिले. तालुक्यातील जनतेला आत्मनिर्भर बनवले. शिक्षण संस्थामुळे आपली पोरं शिकली. जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात आणि कुठल्याही क्षेत्रात आपली पोर पोहोचली. पुणे- मुंबई मध्ये आपल्या पोरांनी आपण आपले वर्चस्व निर्माण केले. याचं श्रेय तुम्हालाच आहे. हे वास्तव फारसे कोणी जाहीररीत्या जरी कुणी म्हणतं नसेल तरी हे नाकारता न येणारे  सत्य आहे. कदाचित तालुक्यातील रस्त्यांवरून कोणी प्रश्न उपस्थित करत असतील. मात्र, दर पंधरा दिवसाला दुधाच्या येणाऱ्या पेमेंट वर प्रत्येक जण समाधानी आहे. तालुक्याचे कल्चर तुम्ही जपलं आणि लोकांनाही जपायला लावलं. फेटा बांधणार नाही, तुमची ही साधी भूमिका होती. मात्र, तिने बराचसा परिणाम साधला.

Advertisement

आपल्या तालुक्यावर कायमच पुणे आणि नाशिकचा प्रभाव दिसतो. अशा परिस्थितीतही संगमनेरकर ही ओळख अधिक स्पष्ट ठेवण्यात आपले योगदान मोलाचे आहे. तुमच्यावर बोलायचं म्हटलं तर मी तासभर ही बोलेन. कारण जेंव्हा राज्यातील नेते बघत आलो, तेंव्हा तुम्ही मला अधिक उजवे जाणवले. म्हणूनच परत म्हणतो एक उत्तम पिता, एक पती आणि एक नेता हाच संगमनेरकरांचा खरा आणि उत्तम पालक आहे. सर, तुमच्या राजकारणाला खरी सुरुवात तर आत्ता झाली आहे. तुम्ही या राज्याचेही नेतृत्व उत्तमपणे कराल. कारण तुमच्यात एक चांगला पालक दडलेला आहे. तुम्हाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा.

Advertisement

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply