Take a fresh look at your lifestyle.

येत्या आर्थिक वर्षात तुमचा पगार होऊ शकतो कमी; वाचा, काय आहे सरकारचा नवा नियम

दिल्ली :

Advertisement

पुढील आर्थिक वर्षाच्या तुलनेत कर्मचार्‍यांच्या हातात येणारा पगार (इनहँड सैलरी) कमी होऊ शकतो. नव्या पारिश्रमिक नियमांतर्गत सरकारने मसुद्याच्या नियमांना अधिसूचित केले आहे. याअंतर्गत कंपन्यांना त्यांच्या पगाराच्या पॅकेजची रचना बदलावी लागू शकते. हे नवे नियम वेतन संहिता, 2019( Code on Wages, 2019) चा एक भाग आहेत आणि पुढील आर्थिक वर्षापासून म्हणजेच एप्रिल २०२१ पासून हे नियम लागू होण्याची शक्यता आहे.

Advertisement

नवीन नियमांनुसार, भत्ता घटक( अलाउंस कंपोनेंट) एकूण पगाराच्या 50 टक्के किंवा सीटीसीपेक्षा जास्त असू शकत नाहीत. म्हणजेच मूलभूत पगार(बेसिक सैलरी) एकूण पगाराच्या 50 टक्के असू शकतो.

Advertisement

हा नियम पाळण्यासाठी कंपन्यांना कर्मचार्‍यांच्या बेसिक पगारामध्ये वाढ करावी लागेल, ज्यामुळे कर्मचार्‍यांना भरावयाच्या ग्रॅच्युइटी पेमेंट आणि भविष्य निर्वाह निधीची रक्कम वाढेल. यामुळे कर्मचार्‍यांचा इनहँड पगार कमी होईल, परंतु सेवानिवृत्ती निधीत(रिटायरमेंट फ़ंड) वाढ होईल.

Advertisement

या नियमाचा मोठा परिणाम खाजगी क्षेत्रातील कर्मचार्‍यांच्या पगारावर होण्याची शक्यता आहे कारण त्यांना सहसा जास्त भत्ता मिळतो. तज्ञांच्या मते, नवीन वेतन नियम लागू झाल्यानंतर कंपन्यांच्या पगाराच्या किंमतीत 10 ते 12 टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज आहे. खास आपल्या माहितीसाठी आम्ही सांगू इच्छितो की, गेल्या वर्षी संसदेत संहिता Code on Wages मंजूर झाली होती.

Advertisement

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply