Take a fresh look at your lifestyle.

प्रत्येक नवरा-बायकोने वाचावी अशी भन्नाट कॉमेडी कविता; वाचा आणि पोटभर हसा

लग्नापूर्वीचे तें गुलाबी दिवस
लग्नानंतर मात्र राहत नाही.
एकदा लग्न लावून दिलं की
देवसुद्धा खाली पाहत नाही.

Advertisement

मग लग्नापूर्वीचा तो हुशार नवरा,
तिला भलताच चक्रम वाटायला लागतो.
आणि हळुहळू तिच्या चेह-यावरचा
प्रेमळ मुखवटा फाटायला लागतो.

Advertisement

त्याचा तो गबाळा अवतार,
तिला नीट्नेटकं राहयचं असतं.
तिला चार दिवस सासूचे..
तर त्याला स्पोर्ट्स चॅनल पाहायचं असतं.

Advertisement

ती थोडी तरी त्याच्यासारखी वागेल,
असं प्रत्यक्षात घडत नाही.
त्याच्या स्वप्नाचे पंख लावून,
ती त्याच्या आकाशात उडत नाही.

Advertisement

तो गच्चीत तिला घेऊन जातो,
इंद्रधनुष्यावर चालायला..
ती सोबत पापड कुरड़या घेते,
गच्चीत वाळत घालायला.

Advertisement

त्याच्या डोळ्यात क्षितिजावरची
लखलखती शुक्राची चांदणी असते.
हिच्या डोक्यात गोडा मसाला
आणि वर्षभराची भाजणी असते.

Advertisement

आपली बायको म्हैस आहे,
असं हा रेडा सगळ्यांना सांगत बसतो.
कोण म्हणतो लग्नाच्या गाठी
देव स्वर्गात बांधत असतो.

Advertisement

कवी – व.पू. काळे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply