Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक : ‘तिथे’ फुटला हिमकडा, अनेक लोक गेले वाहून; वाचा कशी घडली घटना आणि किती लोकांना बसला झटका

दिल्ली :

Advertisement

उत्तराखंडमधील जोशीमठ येथे मोठी दूर्घटना घडली आहे. येथे ग्लेशर कोसळल्याने धरणफुटल्याची घटना घडली आहे. यात अनेक जण वाहून गेल्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. निसर्गाच्या या प्रकोपामुळे उत्तराखंडमध्ये एकच हाहाकार माजला असून या ठिकाणी अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

Advertisement

यात जे लोक वाहून गेल्याचे बोलले जात आहेत ते खालच्या बाजूला राहत असल्याचे सांगण्यात येत आहे. आज सकाळी 10.55 वाजता ही दुर्घटना घडली. जोशीमठ तालुक्यातील रैणी गावात हिमकडा कोसळला. त्यामुळे या धौली गंगा नदीला महापूर आला आहे. त्यातच या धरणाचा कडाही तुटल्याने या ठिकाणी पाणीच पाणी झाले असून अनेक घरे आणि माणसे वाहून गेले आहेत. 

Advertisement

धौली नदीला पूराची सूचना मिळताच अलर्ट जारी करण्यात आला आहे. हरिद्वार जिल्हा प्रशासनाने येथे अलर्ट जारी केला आहे. ऋषिकेशमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. नदीतून बोटींग आणि राफ्टिंग बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती अपर जिलाधिकारी टिहरी शिव चरण द्विवेदी यांनी दिली.

Advertisement

मिळालेल्या महितीनुसार, 10000 लोकांना महापुराचा फटका बसण्याची शक्यता आहे. नदीच्या किनाऱ्यावर राहणारे गावकरी आणि धरणावर काम करणाऱ्या मजुरांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. आयटीबीपी उत्तराखंड पोलीस, राष्ट्रीय आपत्ता व्यवस्थापन आणि राज्य सरकारची टीम घटनास्थळी पोहोचली आहे.

Advertisement

उत्तरांखडमध्ये SDRF टीम नदी शेजारी राहणाऱ्या लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. काही गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. अजूनही काही ठिकाणी लोकं अडकलेली आहे. त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. धौलीगंगा नदीला महापूर आला असून नंदप्रयाग, कर्णप्रयाग, देवप्रयाग, रुद्रप्रयाग या परिसरातील हॉटेल, लॉज आणि घरं खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

Advertisement

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply