Take a fresh look at your lifestyle.

ब्लॉग : कृषी कायद्याच्या पार्श्वभूमीवर कृषि उत्पन्न बाजार समित्यांमधील ‘या’ त्रुटीही घ्या लक्षात; वाचा, महत्वाची माहिती

नवीन कृषी कायदा हा फक्त शेतकरी केन्द्रित असला पाहिजे. ज्यात शेतकरी हिताचा महत्वाचा मुद्दा ‘शेतमाल हमीभाव’ हा असणे अपेक्षित आहे. मात्र या संपूर्ण गदारोळत राजकारण आणि त्यातून भांडवलदारांना मिळणारा नफा यावर जास्त चर्चा सुरू आहे. अडीच महीने शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यांच्या मागण्या रास्त आहेतच. मात्र त्याचवेळी सध्या चालू असलेली व्यवस्था शोषक आहे की नाही, हे पाहणेही तितकेच महत्वाचे आहे.

Advertisement

कायद्यानुसार कृषि उत्पन्न बाजार समित्यांची कामे काय आहे, हे सर्वात आधी जाणून घेणे महत्वाचे आहे. सर्वच कामे लक्षात घेणे एकाच लेखात शक्य नसले तरी काही प्रमुख कामे आपण लक्षात घेऊ :-

Advertisement
  1. बाजाराचे नियंत्रक म्हणून काम पाहणे.
  2. योग्य बाजारभावासाठी पारदर्शकरित्या शेतमालाचे लिलाव आयोजित करणे.
  3. हमी भावापेक्षा कमी दराने विक्री होत असल्यास लिलाव थांबविणे.
  4. बाजारभावाची माहिती शेतक-यांना देणे.
  5. सुरळीत बाजार व्यवस्थेसाठी सर्व प्रकारच्या सुविधा पुरविणे

यातील किती कामे योग्यपद्धतीने आणि आर्थिक शोषणाविना पार पडतात, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. तसेच या व्यवस्थित नियंत्रित बाजारव्यवस्थेत काळाप्रमाणे किंचितही बदल झाला नाही, हा मुद्दाही शेतकरी हिताच्या अंगाने पाहावा.    

Advertisement

आता या व्यवस्थित नियंत्रित बाजारव्यवस्थेत असणार्‍या त्रुटी पाहुयात :-

Advertisement
  1. वाढलेल्या शेती उत्पादनाच्या हाताळणीसाठी पुरेशा सुविधांचा अभाव.
  2. बाजारात अडते, व्यापारी आणि अन्य परवाना धारकांची मर्यादित संख्या
  3. पारदर्शक लिलाव करून बाजारभाव योग्य असल्याबाबत शेतक-यांचे समाधान करण्यात अयशस्वी.
  4. बाजारातील १oo टक्के आवकेची आणि व्यवहारांची नोंद होत नसल्याने घटलेले उत्पन्न.
  5. परवानाधारक, अडते, व्यापारी, हमाल, तोलाईदार इ. वर प्रभावी नियंत्रण नसल्यामुळे होणारी शेतक-यांची पिळवणूक व फसवणूक

आता येणारी व्यवस्था आणि सध्या व्यवस्था यातील फरक लक्षात घेताना हमीभाव, शेतकर्‍यांना प्रश्न विचारण्याचा हक्क आणि या क्षेत्रातील मोनोपॉली या गोष्टी लक्षात घेणे, महत्वाचे आहे.   

Advertisement

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply