Take a fresh look at your lifestyle.

ही शेळी देते दिवसाला ४ लीटर दूध; वाचा, कशी आहे शेळी पालनासाठी फायदेशीर

सध्या शेळीपालन व्यवसाय अतिग्रामीण भागातील शेतकर्‍यांसाठी अत्यंत महत्वाचा ठरतो आहे. त्यामुळे या व्यवसायकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे. शेळी पालनासाठी अन्य जनावरांच्या तुलनेत कमी खर्च येतो. तसेच शेळीचे दूध हे अधिक आरोग्यदायी मानले जाते, अशा काही ठरविक कारणामुळे शेळीपालन महत्वाचे ठरते आहे.

Advertisement

शेळीला भारतात ‘गरीबाची गाय’ म्हणतात आणि कोरड्या जमिनीवर शेती करणायांसाठी हा एक फार महत्वाचा घटक आहे. फार थोडी गुंतवणूक करून शेळी पालन हा किरकोळ आणि लहान शेतकयांसाठी एक फायदेशीर उद्यम ठरू शकतो.  शेळी पालनातून दूध, मांस आणि खत या तिन्ही प्रकारातून पैसा मिळतो.

Advertisement

आज आपण बीटल जातीच्या शेळीबाबत जाणून घेणार आहोत. बीटल जातीची शेळी मांस आणि दुधासाठी प्रामुख्याने उपयुक्त आहे. या शेळीच्या बोकडाचे वजन ५० ते ६० किलो आणि शेळीचे वजन ३५ ते ४० किलोपर्यंत असते. तर दिवसाला ही शेळी २ ते ४ लीटर दूध देते.

Advertisement

कुठे मिळेल ही शेळी :-

Advertisement

बीटल जातीच्या शेळ्या मुख्यत: पंजाब आणि हरियाणामध्ये पहायला मिळतात. पंजाबच्या अमृतसर, फिरोजपूर आणि गुरुदासपूरमध्ये या शेळ्यांचे मोठ्या प्रमाणात पालन केले जाते.

Advertisement

या शेळीचे खाद्य काय :-

Advertisement

पिंपळ, आंबा, कडुनिंब, अशोका या झाडांचा पाला तसेच सुका, हिरवा चारा, हरभरा, शेंगदाणे, बार्ली यांचा चारा ही शेळी खाते.

Advertisement

या शेळीला होतात हे रोग :-

Advertisement

ताप, डायरीया अशी लक्षणे असलेला कोकसीडियोसिस हा आजार सामान्यता छोट्या पिल्लांमध्ये पहायला मिळतो. साधारणपणे आठवडाभर बायोसील हे औषध दिल्यास ही पिले बरी होतात.

Advertisement

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply