Take a fresh look at your lifestyle.

शिवप्रतिष्ठानमध्ये उभी फुट; भिडेंच्या संघटनेला झटका

सांगली :

Advertisement

हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे चालणारी संघटना म्हणून आज लोक शिवप्रतिष्ठानकडे पाहतात, असे म्हटले जाते. अंतर्गत राजकारण हे प्रत्येक संघटनेत असते, मात्र अनेकदा समंजसपणामुळे ते दिसून येत नाही. आता अशातच भिडे यांच्या शिवप्रतिष्ठान संघटनेमध्ये उभी फुट पडली असल्याचे समोर आले आहे.

Advertisement

सांगलीत शिवप्रतिष्ठानचे आक्रमक कार्यकर्ते व पदाधिकारी म्हणून प्रसिद्ध असणारे नितीन चौगुले यांची शिवप्रतिष्ठानच्या पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्याकडे  शिवप्रतिष्ठानचे सांगलीतील कार्यवाहक पद होते. शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन चौगुले यांच्यावर कारवाई केली असून शिवप्रतिष्ठानशी त्यांचा आता काहीही संबंध नाही. त्यांनी म्हटले की, शिवप्रतिष्ठानचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मी प्रसारित करित आहे की, नितीन चौगुले यांना शिवप्रतिष्ठानमधून निलंबित केले आहे, काढून टाकले आहे. तथापि, त्यांच्याशी कोणीही संबंध ठेवू नये.

Advertisement

यावरून  नितीन चौगुले यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. ते म्हणाले की,  दोन दिवसांपूर्वी आम्ही एकत्र होतो. शरजील उस्मानी आणि एल्गार परिषद यांच्याविरोधात दोन दिवसांपूर्वीच सांगलीत आंदोलन केले होते. निलंबीत करण्याचे अद्याप कोणतेही अधिकृत कारण मला समजलेले नाही. आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांची मी भेट घेऊन त्यांना एक निवेदन मी दिले आहे. जी काही कारण असतील ती मला सांगण्यात यावीत.   

Advertisement

यावेळी त्यांनी स्पष्ट केले की,  मला कोणताही गुरुजींचा निरोप मिळालेला नाही. अध्यक्षांकडून माझ्या निलंबनाची घोषणा झाली, त्यामुळे मी त्यांनाच निवेदन दिलेले आहे. या सगळ्या गदारोळावरुन भिडेंच्या शिवप्रतिष्ठानमध्ये उभी फुट पडल्याचे समजत आहे.

Advertisement

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply