Take a fresh look at your lifestyle.

आरोग्यदायी : इम्युनिटी बुस्टरसह ‘त्या’वरही गुणकारी आहेत जांभळाच्या बिया; ‘असा’ करा वापर

महिलांसह सध्या पुरुषही हेल्थ कॉंशीयस आणि चांगले दिसण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यामुळे आता भारतभर वजन नियंत्रित करण्याचा ट्रेंड आहे. त्यासाठी अनेकजण शुद्ध शाकाहारी, शुद्ध मांसाहारी, मिस्त्राहारी किंवा वेगवेगळ्या गोळ्या-औषधांसह डायट करतात. काहीजण व्यायाम करून वजन कमी करतात. अशा सर्वांसाठी आज आपण जांभळाच्या बियांची माहिती पाहणार आहोत.

Advertisement

कृती व महत्व

Advertisement

करोना विषाणूच्या प्रकोपामुळे सगळीकडे रोगप्रतिकार शक्ती अर्थात इम्युनिटी हाही मुद्दा चर्चेत असतो. जांभळाच्या बिया अशा पद्धतीने इम्युनिटी बुस्टर म्हणूनही उपयोगी ठरतात. फ़क़्त बिया यासाठी वापराव्यात. वरचा गर खाल्ल्यावर नंतर राहिलेल्या बिया किंवा बाजारात मिळणाऱ्या चांगल्या बिया यासाठी वापराव्यात. बिया कपड्याने झाकून उन्हात वळवून मग छोटे तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. सकाळी अनुश्यापोटी ही पावडर पाण्यात टाकून प्यावी.

Advertisement

असे आहेत या बियांचे फायदे :

Advertisement

या बियांमध्ये जाम्बोलिन आणि जाम्बोसिन नावाची संयुगे असतात. ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. बियांनी इन्सुलिनचे उत्पादनही नियंत्रणात येऊन शरीराला मदत होते. मधुमेही रुग्णांना हे खूप उपयोगी आहे.

Advertisement

यात भरपूर फायबर असतात. पोटविकार आणि पचनसंस्थेचे कार्य सुधारण्यास याने मदत होते. आतड्यांमधील जखमा, दाह आणि अल्सर यांच्यामध्ये उपयोगी ठरतात. मौखिक औषध म्हणूनही याचा वापर होतो.

Advertisement

उच्च रक्तदाबाने ग्रस्त असलेल्यांसाठी वरदान ठरू शकतात. कारण या फळाच्या बियांमध्ये एक प्रकारचे अँटीऑक्सिडंट असतात. ज्याला अलीजिक आम्ल म्हणतात. याने रक्तदाबाचे तीव्र चढउतार नियंत्रित होण्यास मदत होते.

Advertisement

बियांमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि फिनोलिक संयुगे असतात. जे अत्यंत शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतात. यामुळे वातावरणातील हानिकारक मुक्त कणांना शरीरापासून दूर ठेवण्यास मदत होते. 

Advertisement

फायबर भरपूर असल्यामुळे पोट सुरक्षित ठेवण्यास आणि वजन कमी करण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यास मदत होते.

Advertisement

मात्र, तरीही याचे सेवन खूप प्रमाणात अजिबात करू नये. काहींना यामुळे शुगर लेव्हल खूप कमी होण्याच्या समस्या उद्भवल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळेच याचा वापर प्रमाणात आणि योग्य पद्धतीनेच करावा.

Advertisement

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply