मुंबई :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे म्हणजे मनाला पटेल ती भूमिका जगजाहीर मांडणारे नेते. आताही त्यांनी केंद्र सरकारच्या एका मुद्द्यावर सडेतोड भाष्य केले आहे. जागतिक सेलिब्रिटी मंडळींनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर मानवाधिकाराचा मुद्दा उपस्थित केल्यावर क्रीडा व कला क्षेत्रातील अनेकांनी सरकारच्या समर्थनार्थ ट्विटरबाजी केली आहे.
त्याचाच राज ठाकरे यांनी समाचार घेतला आहे. त्यांनी बॉलीवूड अभिनेता व मोदी सरकारच्या कौतुकात आत्ममग्न असलेल्या अक्षयकुमार यांनाही टोला लगावला आहे. ठाकरे यांनी म्हटले आहे की, कृषी कायद्यांचा निषेध करत अमेरिकन गायक रिहाना आणि इतर सेलिब्रिटींना पाठिंबा देणे ही भारताच्या अंतर्गत कामकाजात हस्तक्षेप करण्यासारखेच होते तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली घोषणाही त्याच प्रकारातील होती.
ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितले की, केंद्राने लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांना त्यांच्या भूमिकेच्या समर्थनार्थ ट्विट करायला सांगायला नको हवे होते. त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा कमी होत आहे. आता सोशल मीडियावर या भारतरत्नांना ट्रोलिंगला सामोरे जावे लागेल.
अक्षय कुमार यांच्यासारख्या कलाकारांच्या वापरापर्यंत सरकारने मर्यादित राहावे. तत्कालीन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात अमेरिकेत ‘पुढच्या वेळी, ट्रम्प सरकार’ सारखे रॅली घेण्याची गरज नव्हती. ती त्या देशातील अंतर्गत बाबी आहेत. ज्या कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन करीत आहेत त्यात काही कमतरता असू शकतात, त्या दूर केल्या पाहिजेत, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.
संपादन : सचिन मोहन चोभे
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- विधानपरिषदेच्या कामकाजाला ‘अशी’ झाली सुरुवात; वाचून नक्कीच वाटेल अभिमान
- प्रविण दरेकरांनी विधान परिषदेच्या सभापतींकडे ‘ही’ आग्रही मागणी; वाचा, नेमकं काय म्हणालेत ते
- बाजारभाव अपडेट : टोमॅटोच्या भावातही हलकीशी घसरण; वाचा, संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- बाजारभाव अपडेट : हरभरा 6000 वर; वाचा संपूर्ण राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : तूर 7,200 च्या पार; वाचा राज्यात कुठे, किती मिळतोय भाव