Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ दिवशी बदलणार ‘या’ 2 बँकांचा IFSC; जाणून घ्या, कसा मिळवायचा घरबसल्या IFSC

मुंबई :

Advertisement

सुमारे दोन वर्षांपूर्वी 2019 मध्ये देना बँक आणि विजया बँक यांचे बँक ऑफ बडोदामध्ये (बीओबी) विलीनीकरण झाले. या निर्णयानंतर देना बँक आणि विजया बँकेचे ग्राहक बँक ऑफ बडोदामध्ये सामील झाले. आता बँक ऑफ बडोदाने आणखी एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे, ज्या अंतर्गत विजया बँक आणि देना बँकेच्या ग्राहकांना 1 मार्चपासून नवीन आयएफएससी वापरावा लागेल.

Advertisement

याबाबत माहिती देताना बीओबीच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, देना बँक आणि विजया बँकेचे आयएफएससी 28 फेब्रुवारीपासून बंद होतील. अशा परिस्थितीत जर तुमचे खाते या दोन्ही बँकांमध्ये असेल तर ते लवकरात लवकर बदलून घ्या कारण असे केले नाही तर 1 मार्चपासून तुम्हाला ऑनलाईन पैशांचा व्यवहार करता येणार नाही.

Advertisement

आयएफएससी (इंडियन फाइनेंसियल सिस्टम कोड) हा 11-अंकी कोड आहे. सुरुवातीच्या चार अंकांवरून बँकेचे नाव आपल्याला कळते. त्यानंतरचे सात अंक शाखा कोड दर्शवितात. बीओबीचा आयएफएससी BKDN0  ने सुरू होते. त्यातील पाचवा अंक शून्य आहे.

Advertisement

असा मिळवा नवा आयएफएससी कोड :-

Advertisement
  1. वेबसाइटवर जा आणि क्यूआर कोड स्कॅन करा.
  2. कस्टमर केअर हेल्प डेस्कवर 1800 258 1700 वर संपर्क साधा किंवा आपल्या शाखेला भेट द्या.
  3. जुन्या खाते क्रमांकासाठी 4 अंकी एसएमएसद्वारे आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून 8422009988 वर MIGR<SPACE> पाठवा.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply