Take a fresh look at your lifestyle.

स्टारलिंकमुळे मिळणार 150 MBPS चा स्पीड; त्याचे भारतीयांना होणार ‘असे’ फायदे

मुंबई :

Advertisement

श्रीमंतांच्या यादीत अग्रस्थानी असलेल्या एलन मस्क यांनी टेस्ला कंपनीच्या भारतीय इलेक्ट्रिक कारसह स्पेसएक्स कंपनी टेलिकॉम सेक्टरमध्ये येण्याची आणण्याची तयारी केली आहे. मस्क यांची कंपनी 100 MBPS स्पीड इंटरनेट देण्याच्या तयारीत आहे.

Advertisement

मस्कची कंपनी स्पेस एक्सप्लोरेशन टेक्नोलॉजीज कॉर्पोरेशन (स्पेसएक्स) स्टारलिंक प्रकल्पातून भारतात प्रवेश करण्याच्या विचारात आहे. स्पेसएक्स प्रारंभी 100 एमबीपीएस गतीसह उपग्रह आधारित इंटरनेट सेवेसह भारतात उतरण्याच्या विचारात आहे. अ‍ॅनालिटिक्सइंडिमाग वेबसाइटनुसार, त्यांनी भारत सरकारकडे उपग्रह आधारित ब्रॉडबँड तंत्रज्ञान सुरू करण्यासाठी परवानगी मागितली आहे.

Advertisement

स्पेसएक्सचा स्टारलिंक प्रकल्प हा पृथ्वीच्या कक्षेत उपग्रहांचा एक समूह आहे. या सेवेमुळे भारतासह जगभरातील दुर्गम भागात चांगली इंटरनेट सेवा पोहोचता येईल. यासाठी कंपनीने सुमारे एक हजार उपग्रह प्रक्षेपित केले असून कंपनी त्यात सातत्याने वाढ करीत आहे. सन 2027 पर्यंत स्पेसएक्स 12,000 डेस्क आकाराचे उपग्रह प्रक्षेपित करण्याची तयारी करत आहे. यात इंटरनेटची गती 50 एमबीपीएस ते 150 एमबीपीएस दरम्यान मिळेल.

Advertisement

सध्या भारतात 700 दशलक्ष इंटरनेट ग्राहक आहेत आणि 2025 पर्यंत ही संख्या 974 दशलक्ष होण्याची शक्यता आहे. सध्याची इंटरनेटची गती 12 एमबीपीएस आहे. तथापि, 5 जीच्या आगमनामुळे इंटरनेटचा वेग वाढू शकतो. परंतु खेड्यांमध्ये आणि दुर्गम भागात जलद इंटरनेट सेवा पोहोचण्यास वेळ लागू शकेल. अशा परिस्थितीत स्पेसएक्सच्या स्टारलिंक प्रकल्पांच्या मदतीने हे काम सहजपणे लवकरच पूर्ण होऊ शकते. दुर्गम भागात फायबर ऑप्टिक केबल्स टाकणे खूपच महाग असल्याने ही उपग्रह आधारित सेवा कमी किंमतीत लोकांपर्यंत पोहोचू शकते.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply