मुंबई :
जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत अग्रस्थानी असलेल्या एलन मस्क यांनी आता भारतीय बाजारपेठेवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. मस्क यांची टेस्ला कंपनी भारतीय बाजारात अलिशान इलेक्ट्रिक कार घेऊन येणार असतानाच आता त्यांची स्पेसएक्स टेलिकॉम सेक्टरमध्ये येण्याची तयारी करीत आहे.
सध्या भारतीय बाजारात सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायंस कंपनीचा बोलबाला आहे. त्यांनी जिओ सेवेच्या मार्फत देशभरात मोनोपॉली करण्याचा प्रयत्न केला आहे. आयडिया-व्होडाफोन, एअरटेल आणि सरकारी बलाढ्य कंपनी बीएसएनएल यांच्यापुढे जिओ आहे. अशावेळी आता मस्क यांची कंपनी 100 MBPS स्पीड इंटरनेट देण्याच्या तयारीत आहे.
मस्कची कंपनी स्पेस एक्सप्लोरेशन टेक्नोलॉजीज कॉर्पोरेशन (स्पेसएक्स) स्टारलिंक प्रकल्पातून भारतात प्रवेश करण्याच्या विचारात आहे. स्पेसएक्स प्रारंभी 100 एमबीपीएस गतीसह उपग्रह आधारित इंटरनेट सेवेसह भारतात उतरण्याच्या विचारात आहे. अॅनालिटिक्सइंडिमाग वेबसाइटनुसार, त्यांनी भारत सरकारकडे उपग्रह आधारित ब्रॉडबँड तंत्रज्ञान सुरू करण्यासाठी परवानगी मागितली आहे.
गेल्या वर्षी टेलिकॉम नियामक प्राधिकरणाने भारतातील ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटीविषयी सल्लामसलतपत्र प्रसिद्ध केले. आता याविषयी स्पेसएक्सच्या उपग्रह शासकीय कार्यवाह पेट्रीसिया कपूर यांनी म्हटले आहे की, स्टारलिंकचे हाय स्पीड उपग्रह नेटवर्क भारतातील सर्व लोकांना ब्रॉडबॅंक कनेक्टिव्हिटीद्वारे जोडण्याच्या उद्दीष्टात मदत करेल.
मस्कच्या स्टारलिंक प्रकल्पाला भारतात मान्यता मिळाली तर कंपनी 5 जी लॉन्च करण्याची तयारी करत असल्याने मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओबरोबर त्यांना संघर्ष करावा लागणार आहे. बँक ऑफ अमेरिका ग्लोबल रिसर्चच्या अहवालानुसार जिओचे 4 जी रोलआउट हे भारतातील इंटरनेट सेक्टरसाठी गेम चेंजर असल्याचे सिद्ध झाले आहे. कंपनीने लोकांना कमी किंमतीत इंटरनेट सेवा दिली आहे. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात इंटरनेट डेटा वापर वाढला आहे. जिओ व्यतिरिक्त, फेसबुक इंकसारख्या कंपन्या दुर्गम भागात इंटरनेट सेवा देण्यासाठी नवीन मार्ग शोधत आहेत. त्यात आता मस्क यांनी उडी घेतली आहे.
संपादन : सचिन मोहन चोभे
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- ‘त्या’ शिक्षक, कर्मचाऱ्यांना खुशखबर; वेतन आयोगाबाबत सरकारने केली मोठी घोषणा
- पुन्हा मिळणार नाही सोने खरेदीची ही संधी; सलग आठव्या दिवशी सोन्याच्या दरात ‘एवढी’ घसरण, वाचा ताजे भाव
- देशात पहिल्यांदाच सुरू झालीय गाढवाच्या दुधाची डेअरी; दूध विकले जातेय ‘एवढ्या’ किमतीला; वाचा, भन्नाट स्टोरी
- दूध पिताना ‘या’ नक्कीच गोष्टी ठेवा लक्षात; अन्यथा…
- घर खरेदी करण्यासाठी सुवर्णसंधी : ‘या’ 2 बँकांनी दिलीय गुड न्यूज