Tvs ची भन्नाट मायलेज देणारी इलेक्ट्रिक स्कूटर झाली लाँच; वाचा, जबरदस्त फीचर्स आणि किंमत
मुंबई :
दिवसेंदिवस इलेक्ट्रिक कारमध्ये अनेक मोठ्या कंपन्या उतरत आहेत. विविध नवनवीन संशोधन घेऊन ग्राहकांना आपल्याकडे ओढण्यासाठी कंपन्यांची स्पर्धा लागलेली आहे. अशातच ऑटो क्षेत्रातील मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय ऑटो क्षेत्रातील एका आघाडीच्या कंपनीने एक भन्नाट इलेक्ट्रिक स्कूटर समोर आणली आहे.
ऑटो क्षेत्रातील आघाडीची कंपनी टीव्हीएसने आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर TVS iQube Electric भारतात लाँच केली आहे. आता ही गाडी तुम्ही कधीही विकत घेऊ शकता. या गाडीच्या बुकिंगसाठी ५ हजार रुपयांची टोकन अमाउंट असून या गाडीची किंमत १ लाख ८ हजार १२ रुपये आहे.
असे आहेत फीचर्स :-
- क्लियर एलईडी हेडलॅम्पस, ऑल एलईडी टेल लॅम्प्स आणि एक इल्यूमिनेशन लोगो दिला आहे.
- पॉवरसाठी 4.4 kW चे इलेक्ट्रिक मोटर दिले आहे.
- एकदा फुल चार्ज केल्यास ७५ किलोमीटर पर्यंत मायलेज
- टॉप स्पीड ७८ किलोमीटर
- जिओ फेसिंग, रिमोट बॅटरी चार्ज स्टेट्स, नेविगेशन असिस्ट, लास्ट पार्क लोकेशन, इनकमिंग कॉल अॅलर्ट
- क्यू-पार्क असिस्ट, मल्टी-सलेक्ट इकोनोमी आणि पॉवर मोड, डे एंड नाईट डिस्प्ले और रीजनरेटिव ब्रेकिंगचा समावेश आहे.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ; ‘त्या’ घोटाळ्याची महाविकास आघाडी सरकार करणार चौकशी
- मुकेश अंबानींचा पुन्हा जगातील श्रीमंतांच्या ‘त्या’ यादीत प्रवेश; पहिल्या 100 श्रीमंतात आहेत ‘हे’ 3 भारतीय
- राकेश झुनझुनवाला आणि त्यांची कंपनी Rare Investmentsने विकले ‘त्या’ कंपनीतील 65 कोटींचे शेअर्स
- इंदिरा गांधींच्या ‘त्या’ वादग्रस्त निर्णयाला राहुल गांधींनीच ठरवले चूक; मात्र सांगितली ‘ती’ही गोष्ट
- बाब्बो.. ठाकरे सरकारचीही कृपा झाली अन ‘जैवविविधता’ताच धोक्यात आली..!