Take a fresh look at your lifestyle.

म्हणून मोदीजींचे सरकार शेतकऱ्यांप्रति असंवेदनशील; पहा AISF चे काय म्हणणे आहे ते

अहमदनगर :

Advertisement

दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी निघालेली किसान पुत्र संघर्ष यात्रा अहमदनगर मध्ये दाखल झाली. ऑल इंडिया युथ फेडरेशन व ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या वतीने संपुर्ण महाराष्ट्रात किसान पुत्र संघर्ष यात्रा सुरु असून, या यात्रेचे हुतात्मा स्मारक येथे स्वागत करण्यात आले. या यात्रेच्या माध्यमातून अहमदनगरसह संपुर्ण महाराष्ट्रातील युवक-युवती शेतकर्‍यांच्या आंदोलनाला खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी दिल्लीला धडकणार आहेत.

Advertisement

हुतात्मा स्मारकात चौथे शिवाजी महाराज यांच्या स्मारकास अभिवादन करुन व त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन सभा घेण्यात आली. यावेळी ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचे राज्य अध्यक्ष विराज देवांग, ऑल इंडिया युथ फेडरेशनचे राज्य सचिव संतोष खोडदे, अविनाश दोंदे, फैजान अन्सारी, दीपक शिरसाठ, कार्तिक पासळकर, कॉ.सुभाष लांडे, भैरवनाथ वाकळे, फिरोज शेख, समृध्दी वाकळे, अरुण थिटे, अमोल चेमटे, राजू नन्न्वरे आदींसह युवक कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement

विराज देवांग म्हणाले की, भांडवलदारांचे सरकार सत्तेवर असल्याने शेतकर्‍यांवर अन्याय, अत्याचार सुरु आहे. मुठभर भांडवलदारांच्या हिताचे निर्णय घेऊन सरकार शेतकर्‍यांप्रति असंवेदनशीलपणे वागत आहे. शेतकरी विरोधी धोरण राबवून शेतकर्‍यांना देशोधडीस लावण्याचे काम केले जात आहे. राजकीय पक्षांना भांडवलदार पैसा पुरवित आहे. तर आपल्या हिताचे निर्णय घेण्यास भाग पाडत आहे. नैतिकता विकून सरकार आपले धोरण राबवित आहे. भांडवलदारांना मोकळे रान दिले जात असून, सरकार जनहितासाठी नव्हे तर भांडवलदारांच्या हितासाठी चालवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

Advertisement

संतोष खोडदे म्हणाले की, सर्वसामान्य जनता कोरोनाशी लढत असताना केंद्रातील भाजप सरकारने संधीचा फायदा घेत बहुमताच्या जोरावर शेतकरी विरोधी काळे कायदे असतित्वात आनले. शेतकर्‍यांनी कोणत्याही प्रकारे कायदे पारीत करण्याची मागणी केलेली नव्हती. तरी देखील केवल भांडवलदारांच्या हितासाठी हे कायदे पारीत करण्यात आले. मोदी सरकार व भांडवलदारांची डील सुरु आहे. भारत सरकार नांव शिल्लक राहिले नसून, हुकुमशाही मोदी सरकार नांव प्रचलित होत आहे. प्रजासत्ताकदिनी शेतकरी आंदोलनात भाडोत्रीचे गुंड घुसवून आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न सरकारने केला.

Advertisement

या संघर्ष यात्रेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना उधवस्त करणार्‍या तीन काळे कायदे रद्दा करण्याच्या जागृती करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित प्रमुख पदाधिकार्‍यांनी आपल्या भाषणात मोदी सरकारवर टिका केली. महाराष्ट्रातून निघालेल्या किसान पुत्र संघर्ष यात्रा मुंबईत एकवटणार असून, दि.8 फेब्रुवारी रोजी शेतकर्‍यांच्या आंदोलनाला खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी दिल्लीला रवाना होत आहेत.

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply