Take a fresh look at your lifestyle.

‘हा’ आहे टिकैतांचा 7/12; वाचा, अनोख्या संघर्षाची कहाणी, पोलिस होते अन 44 वेळा जेलवारीही..!

दिल्ली :

Advertisement

भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांचा सध्या सगळीकडे बोलबाला आहे. सोशल मीडियावर सध्या त्यांच्याविषयी अनेक चर्चा चालू आहेत. काही त्यांच्या बाजूने बोलत आहेत तर काही त्यांच्या विरोधात. वास्तविक पाहता गेल्या काही दिवसात अशा घटना घडल्या आहेत की, शेतकरी चळवळीचे केंद्र म्हणजे यूपी गेट (गाजीपूर सीमा) बनले आहे. यासह भारतीय किसान युनियनचे (टिकैत) राष्ट्रीय प्रवक्ता राकेश टिकैत लाईम लाईटवर आले आहेत.

Advertisement

आज आपण जाणून घेणार आहोत की, शेतकरी नेते राकेश टिकेत नेमके कोण आहेत, ज्यांच्या एका आवाजावर शेतकरी मरायला तयार आहेत. 4 जून 1969 रोजी मुझफ्फरनगर जिल्ह्यातील सिसौली गावात जन्मलेले राकेश टिकेत भारतीय शेतकरी संघटनेचे प्रमुख आहेत.

Advertisement

देशाचे जाने-माने पुढारी आणि प्रसिद्ध शेतकरी नेते महेंद्रसिंग टिकैत यांचा मुलगा राकेश टिकैत हे अनेक दशकांपासून शेतकर्‍यांच्या हक्कांच्या लढाईत सक्रिय आहेत. त्यांनी विविध मंचांवर सातत्याने शेतकर्‍यांच्या हक्कासाठी उपोषणे केली ​​आहेत. असे म्हटले जाते की, राकेश टिकैत हे शेतकर्‍यांच्या हक्कांसाठी तब्बल 44 वेळा तुरूंगात गेले आहेत.

Advertisement

मध्य प्रदेशातील भूमी न्यायाधिकरण कायद्याविरोधात आंदोलन केल्यामुळे राकेश टिकैत यांना तब्बल 39 दिवस तुरूंगात राहावे लागले. काही वर्षांपूर्वी दिल्लीतील संसद भवनाच्या बाहेर उसाचे दर वाढविण्यासाठी केंद्र सरकारचा निषेध केल्यामुळे त्यांना तिहार तुरुंगात पाठविण्यात आले. त्यावेळी राकेश टिकैत यांनी संसद भवनाच्या बाहेर ऊस जाळला होता.

Advertisement

राष्ट्रीय लोक दलाचे अध्यक्ष अजितसिंग यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राकेश टिकैत यांना पश्चिम उत्तर प्रदेशमधील अमरोहा मतदारसंघातून लोकसभेचे उमेदवार केले. त्यावेळी टीकेत यांचा पराभव झाला होता. राकेश टिकैत यांनी मेरठ विद्यापीठातून एमए शिकल्यानंतर एलएलबी केले आहे.

Advertisement

राकेश टिकैत यांचा विवाह बागपत जिल्ह्यातील दादरी गावच्या सुनीता देवीशी 1985 साली झाला. त्यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत. त्यांची सर्व मुले विवाहित आहेत.

Advertisement

1992 साली राकेश टिकैत यांनी दिल्ली पोलिसात हवालदार नोकरी जॉइन केली. त्यांनी पोलिस म्हणून अनेक दिवस काम केले. त्यांचे वडील महेंद्रसिंग टिकैत यांचा राकेश यांच्यावर मोठा प्रभाव आहे. याच कारणामुळे 1993-1994 मध्ये वडील महेंद्रसिंग टिकैत यांच्या नेतृत्वात लाल किल्ले, दिल्ली येथे शेतकरी आंदोलन चालू होते, तेव्हा ते देखील भावनिक झाले. सरकारने त्यावेळी राकेश टिकैत यांच्यावर आंदोलन संपवावे म्हणून दबाव आणला होता.

Advertisement

त्यांना सांगण्यात आले की, राकेश यांनी आपल्या वडिलांना आणि भावांना आंदोलन बंद करण्यास सांगावे. मात्र त्यानंतर राकेश टिकैत यांनी पोलिसांची नोकरी सोडली. अखेर ते शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे राहिले. त्यानंतर कर्करोगाने वडील महेंद्रसिंग टिकैत यांच्या निधन झाले. राकेश टिकैत यांनी भारतीय किसान युनियनची (बीकेयू) कमान सांभाळली.

Advertisement

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply