Take a fresh look at your lifestyle.

प्रचंड फायदेशीर असणारे हे 3 फीचर्स आहेत प्रत्येक मोटरसायकलमध्ये; जाणून घ्या, कसा करायचा त्यांचा वापर

भारतात उपलब्ध असलेल्या मोटारसायकलींमध्ये बरीच उत्तम वैशिष्ट्ये देण्यात येतात. यापैकी बर्‍याच फीचर्सचा वापर आपला प्रवास सुरक्षित करण्यासाठी केला जातो. आपल्या बाईकमध्ये अशी काही वैशिष्ट्ये आहेत जी वापरणे फार महत्वाचे आहेत. मात्र अनेक लोकांना याबद्दल माहिती नसते आणि ज्यांना माहिती असते ते वापरत नाहीत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही फीचर्सविषयी सांगणार आहोत जे भारतीय मोटारसायकलींमध्ये आहेत. आणि ज्याचा वापर केल्यास तुमचा प्रवास सुकर आणि सुरक्षित होईल.

Advertisement
  1. पास: प्रत्येक मोटरसायकलमध्ये पास स्विच असते, जे डाव्या बाजूच्या मुठीत असते.पिवळ्या किंवा काळ्या रंगामध्ये असणारे हे स्विच खूप उपयोगी आहे. जेव्हा आपण मोटारसायकल चालवित असताना तेव्हा एखाद्या वाहनास ओव्हरटेक करताना हे पास स्विच वापरावे.

ज्यामुळे ओव्हरटेक करताना आपल्या समोर असणार्‍या वाहनाला कळते की, आपण ओव्हरटेक करत आहोत. हे पास बटन दाबले की, आपल्या गाडीची पुढची लाइट लागते.  

Advertisement
  • किल स्विच: किल स्विच ही उजवीकडील कन्सोलमध्ये असते. काही लोक यास हिडन इग्नीशन देखील म्हणतात. या स्विचमुळे आपली बाइक अधिक सुरक्षित होते.

जर चोरांनी आपली दुचाकी चोरण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना या बटणाबद्दल माहिती नसेल तर ते बाइक सुरू करूच शकत नाहीत. हे बटण बंद केल्यानंतर बाईक सुरू होत नाही.

Advertisement
  • ट्रिप बटण: बहुतेक बाईकमध्ये तुम्हाला नक्कीच ट्रिप बटण मिळते, त्याद्वारे तुम्ही मोटरसायकल किती दूर चालविली हे तुम्हाला कळते.  हे मीटर तुमच्या पोहोचण्याच्या ठिकाणचे अंतर तसेच तुमच्या मोटरसायकलचे माइलेजदेखील जाणून घेण्यासाठी उपयुक्त ठरते. हे फीचर्स आपल्या बाईकसाठी खूप महत्वाचे आहे. बहुतेक लोकांना हे फीचर वापरणे माहित नाही.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply