दिल्ली :
सर्वच स्तरांतून शेतकरी आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. पंजाबी गायक, अभिनेता यांनीही या आंदोलनाच्या समर्थनार्थ सहभाग घेतला होता.इतकेच नाही तर आतंरराष्ट्रीय मिडीयाने देखील या आंदोलनाची दखल घेतली आहे. अशातच भाजप समर्थक असणारे देओल कुटुंबाला शेतकरी आंदोलनाचा फटका बसल्याची घटना समोर आली आहे.
सिने क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांच्या पत्नी आणि अभिनेत्री हेमा मालिनी तसेच पुत्र अभिनेता सनी देओल हे दोघेही भाजप कडून खासदार आहेत. तसेच त्यांनी भाजपच्या कृषी कायद्यांना पोषक अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे पंजाब आणि हरियाणाच्या संतप्त शेतकर्यांनी देओल कुटुंबाच्या विरोधात भूमिका घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी बॉबी देओलच्या ‘लव हॉस्टेल’ चित्रपटाचे शूटिंग थांबवले होते. चित्रपटाच्या क्रूला शूटिंगविना परत जाण्यास सांगण्यात आले होते. त्यावेळी बॉबी देओलही तेथे उपस्थित होता. नुकतेच पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांनी देओल कुटुंबियांना आपल्या राज्यात शूटिंग करू देणार नसल्याचे म्हटले आहे.
दरम्यान या विषयावर बोलताना खासदार हेमा मालिनी यांनी म्हटले आहे की, मला आश्चर्य वाटले की हे लोक हिंदुस्थानसारख्या सुंदर देशाबद्दल भाष्य करीत आहेत. आमच्या अंतर्गत बाबींवर बोलून यांना काय साध्य करायचं आहे. हे कोणाला खुश करण्यासाठी असं बोलत आहेत.
संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार उचलणार ‘ते’ पाऊल; बघा, नेमकं काय म्हणालेत अशोक चव्हाण
- कोलकाताच्या ‘या’ दुकानात 1 चहा मिळतोय हजार रुपयाला; जाणून घ्या काय आहे या चहाची खासियत
- अर्थसंकल्पानंतर ‘या’ शेअर्सने भरले गुंतवणुकदारांचे खिसे; एका महिन्यात दिला तब्बल 150% परतावा
- रॉम्पस+ ईव्ही स्कूटर या पॉवरफुल सायकलबद्दल आहे का तुम्हाला ‘ही’ माहिती; वाचा की मग महत्वाची माहिती
- म्हणून ‘त्यावेळी’ तपासली होती युवराजची बॅट; पहा कोणी आणि का केले होते असे कृत्य