मुंबई :
भारत हवामान खात्याने (IMD) पावसाळ्याचा पहिला अंदाज जाहीर केला आहे. आयएमडीच्या म्हणण्यानुसार यंदा देशभरात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. संभाव्य 48 टक्के पाऊस हा दीर्घ मुदतीच्या कालावधीतील सरासरीच्या 96 ते 104 टक्क्यांपर्यंत राहील.
हा अंदाज जून ते सप्टेंबरपर्यंत आहे. 21 टक्के संभाव्यता अशी आहे की या काळात देशात सामान्य पावसाच्या 104 ते 110 टक्क्यांच्या दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. उन्हाळा आता सुरू होत आहे, अशा परिस्थितीत तुमच्या मनात असा प्रश्न असेल की, आपल्या भागात पाऊस कधी बरसणार?
असा आहे अंदाज :-
1 जून ते 7 जून: तिरूवनंतपुरम, चेन्नई, उडुपी, पंजिम, गंगवटी आणि आसपासच्या शहरात 1 जून ते 7 जून दरम्यान मान्सूनची एंट्री होऊ शकते.
8 जून ते 13 जून: हैदराबाद, मछलीपट्टनम, विजाग, कटक, पुरी, सतारा, कोल्हापुर, पुणे, मुंबई, अहमदनगर, गया, कोलकाता आणि आसपासच्या भागात 8 जून ते 13 जून दरम्यान मान्सूनची एंट्री होऊ शकते.
14 जून ते 21 जून : सूरत, जलगांव, नागपुर, रायपुर, अहमदाबाद, खंडावा, बिलासपुर, जमशेदपुर, वाराणसी, छपरा, पिथौरागढ़ आणि उत्तराखंडच्या काही शहरात तसेच आसपासच्या भागात 14 जून ते 21 जून दरम्यान मान्सूनची एंट्री होऊ शकते.
21 जून ते 30 जून: भोपाल, भुज, लखनउ, आजमगढ़,आगरा, दिल्ली, चंडीगढ़, शिमला, जालंधर, लद्दाख, श्रीनगर आणि आसपासच्या भागात 22 जून ते 30 जून दरम्यान मान्सूनची एंट्री होऊ शकते.
1 जुलाई ते 8 जुलाई: अजमेर, जैसलमेर, जोधपुर आणि जयपुर आणि आसपासच्या भागात 1 जुलाई ते 8 जुलाई दरम्यान मान्सूनची एंट्री होऊ शकते.
संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- टोमॅटो बाजारभाव अपडेट : पुण्यात 1500 तर सोलापुरात 400; वाचा, संपूर्ण राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : ज्वारीच्या दरातही सलग दुसर्या दिवशी घसरण; पहा, संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- बाजारभाव अपडेट : हरभरा 6400 वर; वाचा संपूर्ण राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : तूर 7,050 च्या पार; वाचा, संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभाव
- बाजारभाव अपडेट : सलग 3 दिवसांपासून कांद्याच्या दरात घसरण; वाचा, संपूर्ण राज्यातील ताजे मार्केट रेट