राज्यपालांच्या विरोधात संजय राऊतांनी थेट ‘तिथे’ जाण्याची दाखवली तयारी; राज्यपालांना दिला गंभीर इशारा
मुंबई :
राज्यपाल कोट्यातून भरावयाच्या विधान परिषदेतील १२ जागा सध्या रिक्त आहेत. राज्य मंत्रिमंडळाने त्यासाठी नावांची शिफारस राज्यपालांना केली आहे. मात्र त्यावर अजूनही निर्णय झाला नसल्याने शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना इशारा दिला आहे. ‘राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. मात्र, राज्यपाल घटनाबाह्य वागत आहेत. १२ आमदारांची नियुक्ती राजकीय नाही. राज्य सरकारने केलेल्या शिफारशी स्वीकारणे राज्यपालांना बंधनकारक आहे. मात्र, राज्यपाल त्यावर निर्णय घेत नाहीत. त्यांनी आम्हाला कोर्टात जाण्यास भाग पाडू नये’, असे राऊत यांनी म्हटले आहे.
यावेळी राऊत हे नाशिकमध्ये बोलत होते. दरम्यान पुढे बोलताना त्यांनी कृषी कायद्यावरून केंद्र सरकारवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, हे सरकार अहंकारी असून बहुमताचा अहंकार योग्य नाही. भविष्यात आणखी काही लाख नागरिक हे दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर येतील.
केंद्र सरकार शेतकरी आंदोलन गंभीरपणे घेत नसल्याचा आरोप करत शेतकरी हिंसक बनण्याची वाट पाहत आहे का?, असा सवालही पुढे बोलताना त्यांनी उपस्थित केला. दरम्यान कालच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राज्यपालांना खडे बोल सुनावले होते.
संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- बॉलिवूडच्या दारावर इन्कम टॅक्सची धडधड; वाचा, कुणाकुणावर झाली कारवाई
- दोन स्टॉक आणि दोन महिने; वॉरेन बफेने कमावले तब्बल 60 हजार कोटी
- प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ; ‘त्या’ घोटाळ्याची महाविकास आघाडी सरकार करणार चौकशी
- मुकेश अंबानींचा पुन्हा जगातील श्रीमंतांच्या ‘त्या’ यादीत प्रवेश; पहिल्या 100 श्रीमंतात आहेत ‘हे’ 3 भारतीय
- राकेश झुनझुनवाला आणि त्यांची कंपनी Rare Investmentsने विकले ‘त्या’ कंपनीतील 65 कोटींचे शेअर्स