Take a fresh look at your lifestyle.

पहा काय झालाय घोळ; काँग्रेसने वेधले साईना व अक्कीच्या ‘त्या’ महत्वाच्या मुद्द्याकडे लक्ष..!

मुंबई :

Advertisement

सध्या देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृषी सुधारणा विधेयकावरून रणकंदन सुरू आहे. जगभरातील अनेक सेलिब्रिटी, लेखक यांच्यासह युनायटेड नेशन्सच्या ह्युमन राईट विंगने शेतकरी आंदोलनाकडे मोदी सरकारचे विशेष लक्ष दिले नसल्याचा मुद्दा मांडला आहे. त्यावर मोदी समर्थक सेलिब्रिटी आणि खेळाडूंनी केंद्र सरकारच्या समर्थनार्थ ट्विट करण्यास सुरुवात केली आहे. त्यातला एक मुद्दा काँग्रेस पक्षाने पकडला आहे.

Advertisement

मात्र, भारतीय खेळाडू आणि सेलिब्रिटी यांच्या ट्विटर पोस्टमध्ये एकसुरीपणा दिसत आहे. नव्हे, अनेकांचे ट्विट तर अगदी स्पेलिंग मिस्टेकसह एकसारखे दिसत आहेत. त्यामुळेच मोदी व केंद्र सरकारचे समर्थक खेळाडू व कलाकार हे ट्विट करीत आहेत की, एकच कंपनी हे सगळे ट्विटर खाते चालवत आहेत असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

Advertisement

एकूणच सुरू असलेल्या या सोशल मिडिया युद्धातील सेम टू सेम प्रकार कसा संशयास्पद आहे याकडे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी लक्ष वेधले आहे. त्यांनी साईना नेहवाल आणि अक्षय कुमार यांच्या ट्विटर पोस्टमधील साम्य दाखवणारी पोस्ट लिहिली आहे.

Advertisement

त्यावर प्रमोद अहिरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, युनायटेड नेशन्सने भारत सरकारला आंदोलन हाताळताना संयम पाळा व मानवी हक्कांचे उल्लंघन टाळा असे ट्वीट केले आहे.आता त्याच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करणार का ? की आमच्या अंतर्गत गोष्टीमध्ये लुड़बुड करू नका असा सल्ला देणार.

Advertisement

तर, गोविंद दळवी लिहितात की, शेतकऱ्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांच्या वयाचा, पदाचा, किंवा कर्तुत्वाचा इथून पुढे मान ठेवला जाणार नाही. कारण अन्न खाणारे शेतकऱ्यांच्या विरोधात कधीच बोलणार नाहीत. आणि ?? खाणाऱ्यांना आम्ही माणसही समजत नाही.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply